स्किन प्रॉब्लेम्समुळे वैतागले आहात?; 'हे' 5 पदार्थ करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 02:50 PM2019-03-05T14:50:30+5:302019-03-05T14:53:36+5:30
हिवाळा असो किंवा उन्हाळा स्किन प्रॉब्लेम्स काही आपली पाठ सोडत नाहीत. अशातच बदलत्या वातावरणात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. अनेकदा आपण त्वचेच्या समस्या उद्भवण्याचा दोष वातावरण किंवा ब्युटी प्रोडक्ट्सला देतो.
हिवाळा असो किंवा उन्हाळा स्किन प्रॉब्लेम्स काही आपली पाठ सोडत नाहीत. अशातच बदलत्या वातावरणात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. अनेकदा आपण त्वचेच्या समस्या उद्भवण्याचा दोष वातावरण किंवा ब्युटी प्रोडक्ट्सला देतो. परंतु इतर गोष्टींना दोष देण्याऐवजी त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं फायदेशीर ठरतं. त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी बाजारातील महागडी उत्पादनं वापरण्याऐवजी स्वयंपाकघरातील 5 गोष्टींचा वापर करणं फायदेशीर ठरतं.
1. पोर्स लपवण्यासाठी
अनेकांच्या त्वचेचे पोर्स फार मोठे असतात. तुम्हाला माहीत आहे का? स्किन पोर्स ओपन झाल्याने धूळ-माती आणि घाण त्वचेमध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अंड्याच्या पांढऱ्या भागाचा स्किन पोर्स स्वच्छ ठेवण्यासाठी आणि ते बंद करण्यासाठी मदत होते. चेहरा पाण्याने धुवून त्यानंतर त्यावर अंड्याच्या पांढऱ्या भागाची एक लेयर लावून ते सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा करा.
2. डार्क सर्कल कमी करा
काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स लाइट करण्यास मदत होते. त्यासाठी काकडी दोन तुकड्यांमध्ये कापून घ्या आणि ते डोळ्यांखाली ठेवा. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. चांगल्या रिझल्टसाठी हा उपाय एका दिवसामध्ये तीन ते चार वेळा करा.
3. पिगमेंटेशन हटवण्यासाठी
त्वचेचा अनइव्हन टोन, डाग, चेहऱ्यावरील निशाण ही सर्व पिगमेंटेशनची लक्षणं आहेत. बटाट्यामध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. यामुळेच हे त्वचेवरील पिगमेंटेशन हटवण्यासाठी प्रभावी आहे. त्यासाठी बटाट्याचा रस काढून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावून धुवून टाका. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. बेस्ट रिझल्टसाठी हे आठवड्यातून दोनदा करणं आवश्यक आहे.
4. टॅनिंग हटवण्यासाठी
उन्हाळा आणि थंडीमध्ये स्किन टॅनिंगची समस्या उद्भवते. टॅनिंग हटवण्यासाठी टॉमॅटोचा वापर करू शकता. टॉमेटोमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे तुम्हाला सनटॅन योग्य पद्धतीने दूर करण्यासाठी मदत मिळते. त्यासाठी टॉमेटोचा रस काढून घ्या आणि सनटॅनमुळे प्रभावित झालेल्या भागावर लावा. 20 मिनिटांननंतर त्वचेला कोमट पाण्याने धुवून घ्या. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा.
5. पिम्पल्स हटवण्यासाठी हळद
त्वचेच्या सर्व समस्यांवर हळदीचा उपयोग होतो. दररोज हळदीचा वापर केल्याने तुम्ही पिम्पल्स आणि ब्रेकआउट्सपासून दूर राहू शकता. एक चिमूटभर हळदीची पावडर एक चमचा गुलाब पाण्यामध्ये एकत्र करून घ्या. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.