पावसाळ्यात कोरड्या आणि तेलकट चेहऱ्याची अशाप्रकारे घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 02:13 PM2018-05-31T14:13:10+5:302018-05-31T14:13:10+5:30

देशातील काही भागात मानसूनचे आगमन झाले आहे. लवकरच देशभरात जोरदार पावसाला सुरुवात होईल. पाऊस म्हटला की, अनेकांचा पावसात भीजण्याचा मोह आवरत नाही.

Skin care Tips for monsoon season : Try these home remedies as per your skin type | पावसाळ्यात कोरड्या आणि तेलकट चेहऱ्याची अशाप्रकारे घ्या काळजी!

पावसाळ्यात कोरड्या आणि तेलकट चेहऱ्याची अशाप्रकारे घ्या काळजी!

देशातील काही भागात मानसूनचे आगमन झाले आहे. लवकरच देशभरात जोरदार पावसाला सुरुवात होईल. पाऊस म्हटला की, अनेकांचा पावसात भीजण्याचा मोह आवरत नाही. पण हे सगळं करताना आरोग्याची, त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरुन आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही कास टीप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. 

पावसाळ्यात होणारे स्किन इन्फेक्शन

पावसाच्या पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन इन्फेक्शन होतात. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात गेल्यास पायांच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. शरीराच्या इतरही भागात अॅलर्जी होऊ शकते. पावसाच्या पाण्यामुळे काही लोकांची त्वचा अधिक जास्त कोरडी होते. त्वचेवर पिंपल्स यायला लागतात. त्यासोबतच केसांचीही समस्या होते. अशावेळी काय काळजी घ्यावी हे खालीलप्रमाणे बघता येईल.

कोरडी त्वचा

पावसाच्या पाण्याचा सर्वात जास्त फटका हा कोरड्या त्वचेवर पडतो. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील टॉक्सिन सहज बाहेर पडतात. जर पावसामुळे त्वचा अधिकच कोरडी वाटत असेल तर जोजोबा ऑइल, ताजं दही आणि मध मिश्रीत करुन एक फेसपॅक तयार करा. हा चेपऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तसेच तुम्ही बदाम आणि मधाचा फेसपॅकही लावू शकता. त्यासोबतच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यात अल्कोहोलचे सेवनही करु नये. 

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी पावसाळ्यातील थंडावा दिलासा देणारा असला तरी याचे काही दुष्परिणामही आहेत. यामुळे स्किन इन्फेक्शन होतं. या दिवसात येणाऱ्या हवेत मोठ्या प्रमाणात दुषित कण असतात, जे त्वचेवर चिकटतात. त्याने स्किन इन्फेक्शन होतं. अशावेळी तुम्ही दिवसातून 3-4 वेळा चेहरा धुवायला पाहिजे. तसेच दूध, दही, लिंबू, गुलाब जल यानेही चेहरा स्वच्छ करा. 

कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी

ज्या लोकांची त्वचा कोरडी आणि तेलकट अशा दोन्ही प्रकारची असते त्यांना या दिवसात खास काळजी घ्यावी लागते. अशावेळी तुम्ही केवळ एकच उपाय करुन चालत नाही. अशी त्वचा असणाऱ्यांनी या दिवसात अधिक पाणी प्यायला हवं. आणि चेहरा सतत धुवायला हवा. चेहऱ्यावर जास्तवेळा हात लावू नये आणि चेहरा पुसण्यासाठी घाणेरडा कपडाही वापरु नये. चेहरा जास्तीत जास्त मॉइस्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करा. 

Web Title: Skin care Tips for monsoon season : Try these home remedies as per your skin type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.