तेलकट त्वचा असलेल्यांनी करु नका या 5 गोष्टी, होईल फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 04:35 PM2018-06-04T16:35:15+5:302018-06-04T16:35:15+5:30
अनेकदा खूपकाही करुनही चेहऱ्यावरील ऑइलची समस्या दूर होत नाही. चला जाणून घेऊया तेलकट त्वचेची कशी घ्यावी काळजी...
स्किनची काळजी घेणे हे किती कठीण असतं हे तेलकट त्वचा असणाऱ्यांना विचारा. तेलकट त्वचा रोज तजेलदार ठेवणं आणि ऑइल फ्रि ठेवणं फार मेहनतीचं काम आहे. चेहरा धुतल्यावरही अनेकदा चेहऱ्यावर तेल येतं. अनेकदा खूपकाही करुनही चेहऱ्यावरील ऑइलची समस्या दूर होत नाही. चला जाणून घेऊया तेलकट त्वचेची कशी घ्यावी काळजी...
1) क्लीजिंग टाळू नका
सकाळी ऑफिसला जाण्याच्या धावपळीत तुम्हाला क्लीजिंग करायला मिळत नसेल तर रात्री करा. रात्री क्लीजिंगसाठी 10 मिनिटे वेळ काढाच. क्लींजरने केवळ 10 मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा आणि नंतर ओल्या टिश्यूने चेहरा कोरडा करा.
2) स्क्रबिंगची चुकीची पद्धत
वेळेवर स्क्रबिंग करणं कोणत्याही स्किनसाठी गरजेचं असतं. पण ते तुम्ही कसे करता हेही महत्वाचं आहे, कारण रिझल्ट यावरच अवलंबून आहे. तेलकट त्वचेवर कधीही स्क्रबिंग कराल तर बोटांचं प्रेशर कमी असायला हवा. जास्त प्रेशर टाकल्यास स्किनची कोमलता नष्ट होते.
3) चुकीचं मॉइस्चरायजर
नेहमी स्किनच्या प्रकारानुसारच मॉइस्चरायजरचा वापर करावा. तेलकट त्वचा असलेल्यांनी मॅट फिनिश असलेल्या मॉइस्चरायजरचाच वापर करायला हवा. लिक्विड फॉर्मच्या मॉइस्चरायजरमुळे स्किन आणखी तेलकट होण्याची शक्यता असते.
4) चेहरा धुवायची वाट बघू नका
तुम्ही जर जिममध्ये जात असाल आणि भरपूर घाम आल्यावर चेहरा घरी जाऊनच धुणार असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. घाम आल्यावर चेहरा जास्त वेळ तसाच ठेवू नका. लगेच चेहरा पाण्याने धुवा.
5) पुन्हा पुन्हा फेसवॉश करणे चुकीचे
सकाळी, दुपारी आणि रात्री फेस वॉश केल्यास किंवा क्लीजिंग केल्यास चांगलं. पण प्रत्येक थोड्या वेळाने चेहरा क्लीज करणे योग्य नाही. असे केल्याने चेहऱ्यातील तेही ऑइल बाहेर येतं जे स्किनवर असणे आवश्यक असतं.