छोटे आणि कमजोर केस कॉफीच्या मदतीने करू शकता मजबूत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:59 PM2019-01-31T12:59:44+5:302019-01-31T13:05:04+5:30
कॉफी पिण्याचं प्रमाण हे शहरांमध्ये अधिक बघायला मिळतं. कॉफी प्यायल्याने डोकं शांत होतं आणि एनर्जी मिळते असं म्हटलं जातं.
(Image Credit : beauty-andhealthy.blogspot.com)
कॉफी पिण्याचं प्रमाण हे शहरांमध्ये अधिक बघायला मिळतं. कॉफी प्यायल्याने डोकं शांत होतं आणि एनर्जी मिळते असं म्हटलं जातं. मात्र, कॉफीचे आणखीही काही फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे कॉफीचा वापर करून तुम्ही तुमच्या रखरखीत केसांना सुंदर करू शकता. चला जाणून घेऊ कॉफीच्या मदतीने केस कसे हेल्दी आणि मजबूत केले जातात.
कॉफीमध्ये आढळणारे काही तत्व असे असतात ज्यामुळे केस मजबूत होतात. कॉफी मेंदूसाठी फार चांगली मानली जाते. कारण याचे सेवन केल्याने स्ट्रेस लगेच दूर होतो. चला जाणून घेऊ याचे फायदे....
(Image Credit : Reward Me)
कॉफी आणि मजबूत केसांचा संबंध
कॉफीमध्ये आढळणारं कॅफीन केस वाढवण्यास मदत करतं. याचा खुलासा अनेक रिसर्चमधून करण्यात आला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कॅफीनमुळे शरीरात फोस्फोडिस्ट्रेस नावाचं एंजाइम वाढण्यास रोखलं जातं. फोस्फेडिस्ट्रेस एंजाइम केसांना कमजोर करण्याचं काम करतो.
फोस्डिफोस्ट्रेस एंजाइम जेव्हा शरीरात कमी होतं, तेव्हा सायक्लिक एडेनोसीन मोनोफॉस्फेटच्या प्रमाणात वाढ होते आणि यामुळे केस वाढण्यास मदत मिळते. कॅफीनमध्ये केसांना चमकदार करण्याचे आणि मजबूत करण्याचे गुण आढळतात. कॅफीन जेव्हा शरीरात जातं तेव्हा शरीराच्या रोमछिद्रांना होणारं नुकसानही कमी होतं.
या मुख्य कारणामुळे कॉफी केसांसाठी फायदेशीर असते. त्यामुळे केसांसाठीही कॉफीचं रोज सेवन केलं पाहिजे. पण जास्त प्रमाणात कॉफीचं सेवनही महागात पडू शकतं. कारण याच्या जास्त सेवनाने अनेक आजारही होतात.