फक्त सात दिवसात बना स्मार्ट !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2016 05:42 PM2016-10-15T17:42:27+5:302016-10-15T18:16:12+5:30
आपण सुंदर दिसावे म्हणून तासंतास ब्युटीपार्लर मध्येवेळ देणाऱ्या महिला आपणास माहित आहेत.
Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
आपण सुंदर दिसावे म्हणून तासंतास ब्युटीपार्लर मध्येवेळ देणाऱ्या महिला आपणास माहित आहेत. मग फक्त महिलाच आपल्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देतात असे नाही, तर पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी अधिक जागरुक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, आपला लूक हटके दिसावा, त्वचा चमकदार व उजळ दिसावी यासाठी तेही बरेच काही करण्यास तयार असतात. मात्र धावपळीत स्वत:कडे पाहण्यासाठी बºयाचदा वेळ नसतो, म्हणून फक्त सात दिवसात आपण कसे स्मार्ट बनणार याविषयी काही टिप्स देत आहोत.
चेहरा चकमदार होण्यासाठी वाटाण्याचे पीठ आणि दही मिक्स करुन लावावा, तर थोडासा चुना व त्यात मध टाकुन लावल्यास त्वचा उजाळण्यासाठी मदत होईल. बदाम, चंदन, कडुलिंबाची पाने आणि हळद हे घटक दुधासोबत एकत्रित मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यास तुमची त्वचा चमकदार दिसले. तसेच आॅलिव्ह तेलाने मसाज केल्यास त्वचा सतेज दिसते. लिंबाचा रस चेहऱ्याला लावल्यास त्वचा स्वच्छ होते. यामुळे ब्लॅक स्पॉटही येत नाहीत. यातील सायट्रिक अॅसिडमुळे त्वचेचे ब्लीच होते. कोरफडमध्ये अॅँटीआॅक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे त्वचेचे चांगल्या प्रकारे मॉईश्चराइजर होते.