...म्हणून लावावे केसांना दही !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 11:09 AM2017-04-26T11:09:47+5:302017-04-26T16:39:47+5:30
आपल्या केसांची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी या आहेत खास टिप्स !
Next
दही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, शिवाय दहीचा त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र एका संशोधनात दही केसांवर वापरल्याने डेड्रफ दूर होतं आणि केसही मजबूत होतात. याशिवाय केसांना काय काय फायदे होतात याविषयी जाणून घेऊया.
केस गळतीवर
कढी पत्ता दह्यात मिसळून पूर्ण केसांवर लावल्याने केस गळतीवर फायदे मिळेल तसेच पांढऱ्या केसांपासून मुक्ती ही मिळेल.
केसांच्या कंडिशनरसाठी
हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करतं. पूर्ण केसांवर दही लावून शॉवर कॅप लावून घ्या. ३० मिनिटाने केस धुऊन टाका.
केस वाढतीसाठी
दही, नारळाचे तेल आणि जास्वंद फुलाची पाने मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून १ ते २ तासांसाठी तसेच राहून द्या. नंतर केस धुऊन कंडिशनर लावून घ्या.
मुलायम केसांसाठी
दह्याला मधात मिसळून मास्क तयार करा. हे केसांना लावल्याने केस मुलायम होती. हे १५ ते २० मिनिटापर्यंत केसांना लावून ठेवावे नंतर धुऊन घ्यावे.
केसांमध्ये चमकसाठी
केसांना मॉइस्जराइज करून चमक आण्याची असेल तर दह्याला मायोनीजबरोबर मिसळावे. हे मिश्रण केसांच्या शेवटल्या कोपरºयापर्यंत लावावे. अर्ध्या तासाने केस सामान्य पाण्याने धुऊन टाकावे.
दोन तोंडी केसांपासून मुक्तीसाठी
आठवड्यातून दोन दिवस केसांमध्ये दही लावा, आपली दोन तोंड असलेल्या केसांची समस्या सुटेल. केस मजबूत होतील.
कोंड्यापासून सुटकेसाठी
कोंड्याची समस्या असल्यास दही आणि लिंबाची पेस्ट लावल्याने आराम मिळेल. आठवड्यातून दोनदा हा उपाय अमलात आणा.