...म्हणून केस होतात पातळ !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 08:55 AM2017-11-23T08:55:42+5:302018-06-23T12:03:26+5:30
केस पातळ होण्याचे कारणे वेगळे असतात आणि आपण उपाय वेगळाच करतो. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय.
दाट आणि काळेभोर केस असले की आपल्या सौंदर्यात अजून भर पडते. मात्र हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. याचाच परिणाम आपल्या सौंदर्यावर पडत असतो. केस दाट करण्यासाठी मग महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात, मात्र अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. कारण केस पातळ होण्याचे कारणे वेगळे असतात आणि आपण उपाय वेगळाच करतो. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय.
* केसांना अतिप्रमाणात तेल लावणे
केसांना अतिप्रमाणात तेल लावण्याने स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची वाढ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात.
* केस रगडून धुणे
शॅम्पू करताना आपण केसांना जोराने रगडत असाल तर आपले केस पातळ होऊ शकतात. शिवाय याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. त्यासाठी शॅम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा.
* ओले केस विंचरणे
बºयाचजणांना ओले केस विंचरण्याची सवय असते. ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा.
* केसांमध्ये हीटचा प्रयोग
जर आपण केसांवर हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.
* तणावग्रस्त राहणे
तणावाचा परिणामही केसांवर होतो. जास्त तणावात राहिल्याने केस पातळ होऊ लागतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मग बघा याचा परिणाम आपल्या केसांवरही दिसून येईल.
* क्रॅश डाइट
केस मजबूत होण्यासाठी हेल्थी आणि बॅलेस डाइट गरजेची आहे. आपल्या आहारात भरपूर आयरन आणि प्रोटिनचा समावेश करा. दुबळं दिसण्याच्या क्रेझमुळे क्रॅश डाइट करणे योग्य नाही.