साबण आणि फेसवॉश नाही तर, 'या' घरगुती वस्तू वापरा अन् चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 06:46 PM2019-04-26T18:46:06+5:302019-04-26T18:46:45+5:30
अनेक लोक आंघोळ करताना जो साबण वापरतात, तोच साबण तोंड धुण्यासाठी वापरतात. अनेक महिला वेगवेगळ्या फेसवॉशचा वापर करतात. परंतु या दोन्ही गोष्टी चेहऱ्याला नुकसान पोहोचवतात.
अनेक लोक आंघोळ करताना जो साबण वापरतात, तोच साबण तोंड धुण्यासाठी वापरतात. अनेक महिला वेगवेगळ्या फेसवॉशचा वापर करतात. परंतु या दोन्ही गोष्टी चेहऱ्याला नुकसान पोहोचवतात. सुरुवातीला जरी हे परिणामकारक वाटलं तरीदेखील हळूहळू चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसू लागते. जाणून घेऊया साबणाने किंवा फेसवॉशचा वापर करून चेहरा धुतल्याने होणाऱ्या नुकसानाबाबत आणि त्याऐवजी चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घरगुती उपायांबाबत...
साबणाचा वापर केल्याने त्वचेला होणारं नुकसान
आपल्या त्वचेचं पीएच 7 पेक्षा कमी असेल तर प्रत्येक गोष्ट आम्लीय आणि त्यापेक्षा जास्त असेल तर क्षारिय असतात. सामान्यतः त्वचेचा पीएच स्तर 4 त 6.5 मध्ये असतो आणि साबण क्षारिय असतो. ज्याचा वापर केल्याने त्वचेच्या पीएच लेव्हलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो.
फेसवॉशमुळेही त्वचा निस्तेज होते
जाहिरातींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचा असा समज झाला आहे की, फेसवॉश त्यांच्या त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित आहे. त्याऐवजी जास्तीत जासत फेसवॉशमध्ये केमिकल्स, रंग आणि सुगंधांचाही वापर करण्यात येतो. ज्यामुळे त्वचा हळूहळू डॅमेज होते. साबण किंवा फेसवॉशचा वापर केल्यामुळे त्वचा निस्तेज होतेच तसेच वाढत्या वयाची लक्षणंही दिसू शकतात.
सेन्सेटिव्ह स्किनसाठी
साबण त्वचेमधील ओलावा दूर करतो. ऑयली स्किन असणाऱ्या लोकांसाठी साबण आणि नुकसानदायी ठरू शकतो. हे स्किनमधून नॅचरल ऑइल आणि सीबम कमी करतं. त्यामुळे त्वचा कोरडी आणि शुष्क होऊ शकते. जर तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर किसी मेडिकेटिड साबणाचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच त्याचा वापर करा.
या घरगुती उपायांनी करा चेहऱ्याची स्वच्छता :
चंदन पावडर
चेहरा स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर एक उत्तम उपाय आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवण्याचा विचार करत असाल तर चंदनाच्या पेस्टचा वापर करू शकता.
अॅलोवेरा जेल
अॅलोवेरा जेलमध्ये थोडी पीठीसाखर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे जवळपास 10 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर मसाज करून थंड पाण्याने धुवून टाका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहरा चमकदार होतो.
कच्चं दूध आहे उत्तम क्लींजर
तुम्ही कच्च दूध चेहऱ्यावर लावू शकता. कच्च दूध चेहऱ्यावर लावू शकता. कच्च दूध चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते.
लिंबू आणि मध
तुम्ही लिंबाच्या रसामध्ये थोडंसं मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. जवळपास 10 मिनिटांसाठी हे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. चेहरा स्वच्छ होतो आणि त्वचा मुलायम होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.