सत्त्वयुक्त आहाराने कमी होतो हृदयविकाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 12:23 PM2016-05-12T12:23:56+5:302016-05-12T17:53:56+5:30

भारतासह ३९ देशांतील १५००० लोकांचा अभ्यास करून आॅस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.

Soft diet reduces heart rate risk | सत्त्वयुक्त आहाराने कमी होतो हृदयविकाराचा धोका

सत्त्वयुक्त आहाराने कमी होतो हृदयविकाराचा धोका

Next
ong>फळे, हिरव्या भाज्या, मासे आणि प्रक्रिया न केलेले अन्न यांचा समावेश भूमध्य प्रदेशातील आहारात होतो. ज्यांना हृदयविकार आणि पक्षाघात यांचा त्रास आहे, त्यांनी दररोजच्या आहारात जर भूमध्य आहाराचा समावेश केला, तर त्यांना निश्चितच फायदा होतो, असे या आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

भारतासह ३९ देशांतील १५००० लोकांचा अभ्यास करून आॅस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. या लोकांच्या जीवनशैलीचा आणि दररोजच्या आहाराचा अभ्यास केला असता असे आढळले की, खूपच कमी लोक सकस आणि सत्त्वयुक्त आहार घेतात.

अनेकांना पाश्चात्त्य देशांमधील सत्त्वहीन आहारच आवडतो. प्रक्रिया केलेले धान्य, मिठाई, डिजर्ट (मिष्टान्न), शर्करायुक्त पेय आणि खूपच तळलेले पदार्थ यांचा आहारात समावेश असतो. मात्र अशा प्रकारचा आहार घेणाºया लोकांना हमखास हृदयविकार होतो.

अशा प्रकारचा सत्त्वहीन आहार घेणाºया लोकांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयविकाराने मृत्यू यांचे प्रमाण अधिक आढळले. मात्र भूमध्य प्रदेशातील सकस आहार घेणाºया लोकांमध्ये हृदयविकार नियंत्रणात असल्याचे आढळले. 

Web Title: Soft diet reduces heart rate risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.