बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 01:08 PM2019-09-21T13:08:55+5:302019-09-21T13:09:09+5:30

आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करत असतात. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षं करतो.

The solution to your hair fall is right there in your kitchen | बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

Next

आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करत असतात. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षं करतो. हिरव्या पालेभाज्या आणि फळं आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. अनेकदा त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. पण त्याऐवजी जर नैसर्गिक उत्पादनांचा आधार घेतला तर त्यामुळे समस्या दूर होण्यासोबतच आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते.
 
केस गळण्याच्या समस्यांनी हैराण असाल तर स्वयंपाक घरात असणारे पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे केसांचं आरोग्य राखण्यासोबतच केस मुलायम आणि दाट होण्यासही मदत होते. 

1. अवोकाडो 

जर तुमचे केस ड्राय आणि निस्तेज झाले असतील तर या समस्या दूर करण्यासाठी अवोकाडोचा उपयोग करू शकता. यामध्ये आढळून येणारी पोषक तत्व व्हिटॅमिन बी आणि ई यांसारखी पोषक तत्व केसांच्या समस्या दूर करतात. त्यासाठी अवोकाडोची पेस्ट 20 मिनिटांसाठी केसांना लावा त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा. 

2. गाजर 

गाजराचा उपयोग करण्यासाठी डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते. ज्याप्रमाणे गाजराचं सेवन दररोज करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे गाजराचा ज्यूस केसांना लावणं केसांसाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी गाजराचा रस काढून 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर केसांच्या मुळांशी लावून काही मिनिटांसाठी तसचं ठेवा. अर्धा तास ठेवल्यानंतर केस धुवून टाका. 

3. कांदा 

कांदाचा रस केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करतो. त्याव्यतिरिक्त केसांच्या मुळांना मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि केसांचं आरोग्य सुधारतं. तसेच केसांची वाढही होते. 

4. केळी 

केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि पोटॅशिअम अस्तित्तावत असतं. जे केसांसाठी अत्यंत फायेदशीर ठरतं. केसांच्या मजबुतीसाठी केळी स्मॅश करून घ्या. त्यामध्ये मध एकत्र करून पेस्ट तयार करा. केसांच्या मुळांशी लावून 30 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतप माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. 

(Image Credit :Medical News Today)

5. नारळाचं दूध 

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेतच. तसंच नारळाचं दूधही आरोग्यासोबतच केसांसाठी फायदेशीर ठरतं. नारळाचं दूध केसांसाठी सर्वात उत्तम उपाय मानला जातो. नारळाच्या दूधामध्ये मध एकत्र करून केसांना लावल्यामुळे डोक्याच्या त्वचेला मालिश करा. एक तास तसचे ठेवा त्यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. 

6. दलिया 

दलियामध्ये आढळून येणारी पोषक तत्व आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त हे केसांना पोषक तत्व पुरवतात. एक मोठा चमचा ताज्या दूधामध्ये दलिया एकत्र करून केसांच्या मुळांना लावा. 30 मिनिटांनी कोमट पाण्याने केस स्वच्छ करा. यामुळे केस मजबुत होण्यासोबतच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: The solution to your hair fall is right there in your kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.