केसांवर असेल प्रेम तर 'या' ७ चुका करणं टाळा, कितीतरी समस्या होतील दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:06 PM2019-12-20T12:06:38+5:302019-12-20T12:13:37+5:30
काळे, लांब, दाट आणि सुंदर केस प्रत्येकालाच हवी असते. पण नकळत आपण अशा काही चुका करतो.
(Image Credit : stylecaster.com)
काळे, लांब, दाट आणि सुंदर केस प्रत्येकालाच हवी असते. पण नकळत आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे केसा डॅमेज होतात. या चुका जर टाळाल तर केस चांगले राहतील. चला जाणून घेऊ काय आहेत या चुका....
१) जास्त कंडीशनरचा वापर
(Image Credit : rd.com)
जास्तीत जास्त लोक ही चूक करतात. कारण त्यांना असं वाटत असतं की, जास्त कंडीशनर लावल्याने त्यांचे केस जास्त सॉफ्ट होतील. पण असं नाहीये. केसांची लांबी आणि केस कसे आहेत त्यानुसार कंडीशनरचा वापर करावा. आणखी एक चूक लोक करतात. ती म्हणजे लोक शॅम्पूप्रमाणे कंडीशनर लावतात. म्हणजे केसांच्या मुळात. पण कंडीशनर केवळ केसांना लावायचं असतं.
२) चुकीचा शॅम्पू निवडणे
तुमच्या डोक्याची त्वचा ड्राय किंवा ऑयली असेल, तुमचे केस ड्राय किंवा ऑयली असतील किंवा तुम्हाला डॅंड्रफची समस्या असेल तर योग्य शॅम्पूची निवड केली पाहिजे. तसेच सतत शॅम्पू बदलू नये.
३) केस ट्रीम न करणे
नियमितपणे केस ट्रीम केल्याने त्यांचा लूक चांगला होईलच सोबतच दोन तोंड असलेल्या केसांपासूनही सुटका मिळेल. केसांना दोन तोंड असेल तर त्यांचा विकास खुंटतो. त्यामुळे नियमित केस ट्रीम करा.
४) सतत कंगवा फिरवणे
असं मानलं जातं की, रोज केसांमध्ये १०० स्ट्रोक्स असायला पाहिजे. पण हे अवलंबून यावर आहे की, तुम्ही कंगवा कसा फिरवता. कारण ड्राय केसांमध्ये सतत कंगवा फिरवल्याने केस तुटतील. तसेच केसांच्या मुळातही जास्त फ्रिक्शन होतं. ज्याने केस डॅमेज होतात.
५) जास्त केमिकल
केस नॅच्युरली जेवढे चांगले ठेवाल तेवढं चांगलं असतं. सतत केमिकल ट्रीटमेंट करत रहाल तर केस डमेज होतात. त्यामुळे केसांवर नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करा.
६) स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा जास्त वापर
केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकजण प्रमाणापेक्षा जास्त स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा वापर करतात. असं केल्याने केस फार जास्त डॅमेज होता. केसगळती आणि तुटण्याची समस्या होऊ लागते.
७) झोपताना केस टाईट बांधणे
अनेक महिला रात्री झोपताना केस टाईट बांधतात. ही पद्धत चुकीची आहे. अशाप्रकारे केस बांधल्याने केस तुटतात.