थंडीत केसांच्या सर्व समस्यांवर 'हे' घरगुती तेल ठरतं फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 12:45 PM2019-11-04T12:45:01+5:302019-11-04T12:45:29+5:30

सौंदर्य जपण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच केसांचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं वातावरण बदलत जातं तसा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो.

Special homemade oil for hair growth and dandruff issues | थंडीत केसांच्या सर्व समस्यांवर 'हे' घरगुती तेल ठरतं फायदेशीर

थंडीत केसांच्या सर्व समस्यांवर 'हे' घरगुती तेल ठरतं फायदेशीर

googlenewsNext

सौंदर्य जपण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच केसांचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं वातावरण बदलत जातं तसा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. हिवाळा सुरू होताच कोरड्या त्वचेचा सामना करावा लागतो. स्काल्प म्हणजेच, डोक्याची त्वचाही ड्राय होते. त्यामुळे केसांमध्ये कोंड्याचीही समस्या उद्भवते. कोंड्यामुळे केसांचं सौंदर्य कमी होतं. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणं आवश्यक असतं. 

हिवाळ्यात ड्राय स्काल्पपासून बचाव करण्यासाठी केसांना आवश्यक असणारी पोषक तत्व पुरवणं गरजेचं असतं. कोंडा आणि केसांशी निगडीत समस्यांपासून बचाव करण्यासाठी बाजारात तुम्हाला अनेक हेअर ऑइल मिळतील. आज आम्ही अशाच एका हेअर ऑइलबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ते तुम्ही अगदी सहज घरीही तयार करू शकता. या ऑइलचा वापर फक्त केसांतील कोंडा दूर करण्यासाठीच नाहीतर त्यांच्या वाढीसाठीही फायदेशीर ठरतो. 

तेल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • कॅस्टर ऑइल - 2 चमचे 
  • लेव्हेंडर ऑइल - अर्धा चमचा
  • मेहंदी ऑइल - एक चमचा
  • खोबऱ्याचं तेल - एक चमचा 

 

तेल तयार करण्याची पद्धत : 

  • केसांसाठी हे तेल तयार करण्यासाठी सर्वात आधी तीन तेलांना एकत्र करावं लागेल. एका बाउलमध्ये व्यवस्थित एकत्र करा. 
  • एकत्र केल्यानंतर तेल 10 ते 15 मिनिटांसाठी उन्हात ठेवा. त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे तेल भरून ठेवा. 
  • आता केसांमध्ये स्प्रे बॉटलच्या मदतीने तेल एकत्र करा. ऑइल स्प्रे करताना लक्षात ठेवा की, केसांच्या मुळांना व्यवस्थित तेल लागलं पाहिजे. त्यानंतर आंघोळीच्या एक तास अगोदर आपल्या हातांनी केसांच्या मुळांना मसाज करा. 

 

आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल. जाणून घेऊया या सर्व तेलांचा केसांना कसा फायदा होतो त्याबाबत... 

कॅस्टर ऑइल 

कॅस्टर ऑइलमघ्ये असलेले फोलिकल्स केस मुलायम करण्यासाठी आणि केसांना पोषण पुरवण्यासाठी मदत करतात. यासाठी अॅन्टी-व्हायरल, अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुणधर्म केसांना प्रदूषणामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला मुलायम आणि स्मूद केस मिळण्यास मदत होते. 

लव्हेंडर ऑइल 

लव्हेंडर एक फूल असतं. ज्याच्या झाडाच्या पानांपासून हे तेल तयार केलं जातं. लव्हेंडर ऑइल केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. 

मेहंदी ऑइल 

मेहंदी ऑइल म्हणजेच, ज्याचा वापर हातांवर लावलेल्या मेहंदीचा रंग आणखी खुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. मेहंदी ऑइल केसांची ग्रोथ वाढवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर यामुळे स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहतं. 

खोबऱ्याचं तेल 

खोबऱ्याच्या तेलाचा वापर अनेक लोक बऱ्याच दिवसांपर्यंत करतात. खोबऱ्याचं तेल केसांना मुलायम आणि शायनी करण्यासाठी मदत करतं. तसेच केसांतील कोंड्याची समस्याही दूर होते.
 
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Special homemade oil for hair growth and dandruff issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.