आकर्षक आयब्रोज हवे असतील 'या' घरगुती टीप्स नक्की वापरा, मग बघा कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:49 PM2020-01-11T12:49:16+5:302020-01-11T12:58:18+5:30
प्रत्येकालाच आपल्या आयब्रोजचे केस वाढवायचे असतात.
(image credit- the lassi.com)
प्रत्येकालाच आपल्या आयब्रोजचे केस वाढवायचे असतात. कारण तुमच्या भुवया तुमच्या व्यक्तीमत्वात भर टाकत असतात. तसंच आकर्षक दिसण्यासाठी भुवया दाट आणि काळ्याभोर असणं गरजेचं असतं. डोळ्यांच्या सुंदर दिसण्यामागे भूवया सुध्दा तितक्याच महत्वाच्या असतात. आयब्रोजना व्यवस्थित शेप देणं खूप कठिण असतं. अनेकदा वेगवेगळे प्रयत्न करून सुद्धा आयब्रोजचे केस वाढतं नाहीत. त्यामुळे चेहरा नीट दिसत नाही. म्हणून आयब्रोपेन्सिलचा वापर अनेक महिला करतात. आज आम्ही तुम्हाला आयब्रोज सुंदर दिसण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःचे आयब्रोज दाट मिळवू शकता.
नारळाचं तेल
केसांची काळजी घेण्यासाठी तसंच केसांच्या वाढीसाठी नारळाचं तेल खूप फायदेशीर ठरतं असतं. तसंच आयब्रोच्या केसांसाठी सुद्धा नारळाचं तेल लावणं फायदेशीर ठरतं असतं. कारण पोषण देण्याचे काम तेलाद्वारे होत असतं. त्यासाठी नारळाच्या तेलाला कोमट गरम करून त्या तेलाने भुवयांच्या भागावर हलक्या हाताने मसाज केल्यास भुवयांची त्वचा चांगली राहते . तसंच केसांची सुद्धा वाढ होते.
बादामाचं तेल
केस गळण्यापासून रोखण्यासाठी बादामाच्या तेलाचा वापर केला जातो. केसांना मजबूती देण्यासाठी व्हीटामीन ई ची आवश्यकता असते. बदामाच्या तेलात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणावर असतं. यात असणारे एंटी ऑक्सीडेंट्स स्किन आणि केसांसाठी चांगले असतात. त्यामुळे या तेलाने भुवयांची मसाज केल्यास भुवयांचे केस दाट आणि काळे होतात.
राईचं तेल
राईच्या तेलाने मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. राईच्या तेलाने भुवयांच्या केसांची मसाज केल्यास त्वचेला पोषण मिळते. तसंच त्या भागातील केस जलदगतीने वाढतात.
पेन्सिलचा योग्य वापर
जर तुम्ही स्वतःच भुवयांना योग्य आकार देण्याचा विचार करत असाल तर, आयब्रो पेन्सिलचा रंग निवडताना काळजी घ्या. हा रंग तुमच्या भुवयांच्या रंगाशी मिळता जुळता असला पाहिजे. जर तुम्ही रंग निवडताना कनफ्यूज असाल तर नेहमी डार्क रंगाचीच निवड करा. जर तुमच्या भुवयांच्या केसांचा रंग ब्राऊन असेल तर त्यासाठी डार्क ब्राऊन रंगाच्या आयब्रो पेन्सिलची निवड करा. त्यामुळे भुवयांचा रंग नॅचरल दिसण्यास मदत होईल.