ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि स्टायलिश दिसण्यासाठी खास 'या' टीप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:45 PM2020-01-19T15:45:08+5:302020-01-19T16:00:10+5:30
प्रत्येकाला ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्ताने कुठेही बाहेर जायचं असल्याल खूप आकर्षक आणि प्रेजेन्टेबल दिसायच असतं.
( image credit-extrapetite)
प्रत्येकाला ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्ताने कुठेही बाहेर जायचं असल्यास खूप आकर्षक आणि प्रेजेन्टेबल दिसायच असतं. कारण सध्याच्या काळात तरूण मुला मुलींसोबतच मध्यम वयाचे लोकं आपल्या आरोग्याबद्दल आणि राहणीमानाबद्दल जागरूक दिसून येतात. त्यानुसार त्यांचे कपडे तसंच हेअरस्टाईल असते . जर तुम्हाला सुद्धा ऑफिसला जात असतान प्रेजेन्टेबल आणि प्रोफेशनल दिसायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्या टीप्सचा वापर तुम्ही रोजच्या जगण्यात केला तर साध्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टायलिश दिसू शकता.
(image credit- viva glam magazine)
जर तुम्हाला ऑफिसमध्ये जिन्स घालण्यासाठी परवानगी असेल तर तुम्हा पांढरा रंग असलेला शर्ट आणि काळ्या रंगाचा ब्लेजर घालू शकता. त्याचसोबत जर तुम्ही हाय हिल्सच्या चपला घातल्या तर तुम्ही स्टायलिश आणि प्रोफेशनल दिसाल.( हे पण वाचा-नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा)
(image credit- firstceryparanting)
प्लेन टॉप घातला असेल तर तुम्ही प्लाजो घालू शकता. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काळ्या आणि पांढरा रंग असलेल्या स्ट्राईपवाल्या प्लाजो घातल्या तर लूक चांगला येईल. तसंच त्यावर प्रिंटेड टॉप घालू शकता.
जर तुम्हाला प्रोफेशनल लुक आवडत असेल तर व्हाईट शर्टसोबत काळ्या रंगाची पॅण्ट घालू शकता. कारण ही फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. जर तुम्हाला काही ट्रेडिशनल लुक करायचा असेल तर मोठी कुर्ती आणि सिगारेड पॅण्ट घालू शकता कारण सध्याच्या काळात सिगारेट पॅण्टचा खूप क्रेज आहे. ( हे पण वाचा-घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज! )
तुम्ही ब्लेजर, शर्टच्या सोबत पेंसिल स्कर्ट सुद्धा घालू शकता किंवा प्लेट्स स्कर्टमुळे सुद्धा चांगला लूक येईल.
कपडे खरेदी करत असताना या गोष्टीं लक्षात ठेवा की तुमच्या बॉडी लॅन्गवेजला सुड करेल अशीच ड्रेसिंग करा. कोणत्याही पोस्टरवरच्या मॉडेलला पाहून तसे कपडे अजिबात घेऊ नका. पर्सनॅलिटी आणि तुमच्या कामाचे स्वरूप म्हणजेच तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करता किंवा फिल्ड वर्क करता हे पाहूनच मग कपडे घ्या.