केसगळती थांबवण्यासाठी सर्वात खास नैसर्गिक उपाय, 'असा' तयार करा पालकाचा हेअर पॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:47 AM2020-01-15T11:47:03+5:302020-01-15T11:47:16+5:30
हिवाळ्यात पालकाची भाजी खाणं आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी चांगली मानली जाते. पण अनेकांना हे माहीत नाही की, पालकाचा वापर तुम्ही केसांची वाढ करण्यासाठी देखील करू शकता.
हिवाळ्यात पालकाची भाजी खाणं आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी चांगली मानली जाते. पण अनेकांना हे माहीत नाही की, पालकाचा वापर तुम्ही केसांची वाढ करण्यासाठी देखील करू शकता. याने तुमची केसगळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्याही नैसर्गिक पद्धतीने दूर होईल. चला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पालक कशाप्रकारे केसांसाठी हेल्दी आहे आणि याचा वापर कसा करावा.
केसांना पालकाचे होणारे फायदे
पालकाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न, मॅगनीज, झिंक, ओमेगा - ३ फॅटी अॅसिड आणि फोलेट ही तत्वे असतात. या तत्वांनी तुम्हाला केस वाढवण्यासाठी मदत होते. यातील व्हिटॅमिन ए त्वचेमध्ये सीबमच्या प्रॉडक्शनमध्ये मदत करतात आणि ज्याने डोक्याची त्वचा हेल्दी राहते. सीबम हे एक ऑयली आणि वॅक्ससारखं तत्व असतं जे त्वचेतील सिबेसियस ग्लॅंडमधून निघतं.
केसांची वाढ आणि आयर्नची भूमिका
(Image Credit : healthline.com)
केसांची वाढ होण्यासाठी आयर्नची महत्वपूर्ण भूमिका असते आणि आयर्न हे पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असतं. आयर्नमुळे केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते आणि याने केस हेल्दी व मजबूत राहतात.
केस डॅमेज होणार नाहीत
पालकात अॅंटी-ऑक्सिडेंट अधिक प्रमाणात असतात ज्याने केसांना होणाऱ्या कोणत्याही नुकसानापासून बचाव केला जाऊ शकतो. आणि डोक्याची त्वचा हेल्दी राहते. याने अर्थातच केसगळती थांबते.
डॅंड्रफपासून सुटका
(Image Credit : YouTube)
पालकातील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फेमेटरी तत्वांमुळे डॅंड्रफ होत नाहीत. या डॅंड्रफमुळेच केस कमजोर होतात आणि तुटतात.
केसांसाठी पालकाचा हेअर पॅक
२५० ग्रॅम पालकाची पेस्ट तयार करून त्यात एका लिंबाचा रस टाका. २ चमचा मध आणि काही खोबऱ्याच्या तेलाचे थेंब टाकून चांगलं मिश्रण करा. त्यानंतर हा पॅक केसांवर चांगल्याप्रकारे लावा आणि २ तासांसाठी तसाच राहू द्या. नंतर एका माइल्ड शॅम्पूने केस चांगले स्वच्छ करा. लिंबातील सिट्रिक अॅसिडमुळे केसातील धुळ-माती निघून जाते. तर खोबऱ्याच्या तेलाचा डोक्याच्या त्वचेवर मॉइश्चरायजरसारखा वापर होतो. याने केस मजबूत होतात.