सिगारेट सोडण्यासाठी ‘टपरी’पासून दूर राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2016 01:33 PM2016-08-18T13:33:28+5:302016-08-18T19:03:28+5:30

घरापासून सिगारेट आणण्यासाठी ५०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर जावे लागत असेल तर स्मोकिंगचे व्यसन सोडण्याची शक्यता वाढते.

Stay away from 'Trepary' to leave the cigarette | सिगारेट सोडण्यासाठी ‘टपरी’पासून दूर राहा

सिगारेट सोडण्यासाठी ‘टपरी’पासून दूर राहा

Next
गारेट-तंबाखूचे व्यसन किती घातक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सर्व दूष्परिणाम माहीत असूनही सिगारेट सुटत नाही. त्यसाठी विविध उपाय - निकोटिन पॅच, रिहॅब, व्यसनमुक्ती केंद्र - उपलब्ध आहेत. परंतु एक साधा पर्याय संशोधनातून समोर आला आहे.

फिनलँडमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार जर तुमच्या घरापासून सिगारेट आणण्यासाठी ५०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर जावे लागत असेल तर स्मोकिंगचे व्यसन सोडण्याची शक्यता वाढते. टुर्कू विद्यापीठातील अ‍ॅना पुलाक्का व सहकाऱ्यांनी सिगारेट पिणाऱ्या व पूर्वी पिणाऱ्या लोकांवर करण्यात आलेल्या अध्ययनांचा अभ्यास करून स्मोकिंगचे व्यसन सुटण्याचे प्रमाण आणि घरापासून सिगारेटच्या दुकानाचे अंतर यांचा संबंध उजागार केला.

सुमारे वीस हजार लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. घरापासून ‘टपरी’पर्यंतच्या अंतरामध्ये होणाऱ्या प्रत्येक ५०० मीटरची वाढीबरोबर व्यसन सुटण्याची शक्यता २० ते ६० टक्क्यांनी वाढते. तंबाखूचे व्यसन आत जागतिक समस्या बनली आहे. रहिवाशी भागात सिगारे-तंबाखूजन्य पदार्थ मिळणारी दुकाने हे व्यसन वाढविण्यास हातभार लावतात असे लक्षात येताच सरकारी धोरणांमध्ये यादृष्टीने सकारात्मक बदल करण्यात येतील अशी संशोधकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे स्मोकिंग बंद करायची असेल तर ‘टपरी’पासून दूर घर घेण्याचे पाहा.

Web Title: Stay away from 'Trepary' to leave the cigarette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.