'सनसेट आय मेकअप' कराल, तर सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 01:17 PM2019-03-01T13:17:06+5:302019-03-01T13:22:06+5:30

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात होणारी रंगांची उधळण पाहण्यासारखं सुख नाही, असं म्हणतात तेच खरं... निसर्ग नेहमीच आपल्या सौंदर्याने भूरळ घालत असून कलाप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतो.

This Steps That Can Help You Create Perfect Sunset Eyes Makeup | 'सनसेट आय मेकअप' कराल, तर सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील!

'सनसेट आय मेकअप' कराल, तर सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील!

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात होणारी रंगांची उधळण पाहण्यासारखं सुख नाही, असं म्हणतात तेच खरं... निसर्ग नेहमीच आपल्या सौंदर्याने भूरळ घालत असून कलाप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का? हे सूर्यास्ताचे रंग तुम्ही जर तुमच्या मेकअपसाठी वापरले तर? गोंधळलात का? सध्या ब्युटी ट्रेन्डमध्ये एक अनोखा ट्रेन्ड व्हायरल होत आहे. त्याचं नाव आहे 'सनसेट आय लूक'. यामध्ये आय शॅडोसाठी सूर्यास्तावेळी आकाशात दिसणाऱ्या रंगांचा वापर करण्यात येतो. ऑरेंज, यलो आणि थोडासा बरगंडी कलरचा वापर करण्यात येतो. जर तुम्हालाही या ट्रेन्डमध्ये सामिल व्हायचे असेल तर तुमच्यासाठी आम्ही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सनसेट आय लूक मिळवू शकता. जर तुम्ही व्यवस्थित टिप्स फॉलो करून आय शॅडोचा वापर केलात तर खरचं हा लूक दिसण्यास अत्यंत सुंदर दिसतो. 

सनसेट आइज लूक करण्यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये या गोष्टी असणं आवश्यक आहे. 

1. आय शॅडो पॅलेट ज्यामध्ये ऑरेंज, यलो आणि बरगंडी शेड आहेत.


2. आस शॅडो पॅलेट ज्यामध्ये न्यूड शेड्स आहेत. 


3. ऑय शॅडो ब्रश 


4.  प्रायमर


5.  लूज पावडर 


6. लिक्विड लायनर


7.  मस्कारा

असा करा सनसेट आय लूक :

1. प्रायमर 

सर्वात आधी आपल्या पापण्यांवर व्यवस्थित प्रायमर अप्लाय करा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर मेकअप बराच वेळ टिकण्यास मदत होइल. 

2. डोळ्यांचं तीन भागांमध्ये वर्गीकरण करा

मनातल्या मनात डोळ्यांचं तीन भागांमध्ये वर्गीकरण करा. पहिला भाग तुमच्या डोळ्यांच्या एका किनाऱ्यापासून ते दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत. दुसरा भाग डोळ्यांचं बुबुळ आणि शेवटचा भाग असेल तिसरं सेक्शन.

3. मेकअपचा बेस

संपूर्ण पापणीवर ब्राइट शेडचा बेस लावा. त्यामुळे याचे रंग आणखी उठून दिसतील. 

4. पहिला भाग 

डोळ्यांच्या पहिल्या भागामध्ये पिवळ्या रंगाच्या आय शॅडोचा वापर करा. 

5. दुसरा भाग 

दुसऱ्या भागामध्ये ऑरेंज कलरची शेड लावावी. पण लक्षात ठेवा डोळ्यांच्या बुबुळांवरच लावा. मुलायम ब्रशने दोन्ही रंग व्यवस्थित एकत्र करा. 

6. तिसरा भाग

डोळ्यांच्या बाहेरील भागामध्ये बरगंडी रंग लावावा. त्यानंतर ऑरेंज आणि रेड कलरचा शेड ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करा. पापण्यांच्या किनाऱ्यांवर मजंटा कलरचा डार्क शेडही वापरू शकता. जर तुम्ही दिवसासाठी मेकअप करत असाल तर मजंटा कलरची शेड सोडूही शकता. 

7. फायनल टच

सर्वात शेवटी ब्लॅक आयलायनरचा वापर करा आणि मस्कऱ्याने शेवट करा. दरम्यान, हा लूक जास्त ग्लिटरी नसला तरि थोडासा हटके आहे. तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी किंवा पार्टीसाठी हा लूक करू शकता. मेकअप करतानाही या शेड्सचा वापर केल्यास लू क आणखी खुलून दिसण्यास मदत होइल. 

Web Title: This Steps That Can Help You Create Perfect Sunset Eyes Makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.