केस होतील मजबूत अन् केसगळतीही थांबेल, मेथीचा 'असा' करा वापर; मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:13 PM2024-09-25T12:13:41+5:302024-09-25T12:25:17+5:30

Methi For Hair Care : नेक नॅचरल उपाय आहेत ज्यांनी तुम्ही केस मजबूत करू शकता आणि केसांमधील कोंडा दूर करू शकता. मेथीचे दाणे यासाठी खूप फायदे मानले जातात.

Struggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek (Methi Seeds) May Help | केस होतील मजबूत अन् केसगळतीही थांबेल, मेथीचा 'असा' करा वापर; मग बघा कमाल!

केस होतील मजबूत अन् केसगळतीही थांबेल, मेथीचा 'असा' करा वापर; मग बघा कमाल!

Methi For Hair Care : आजकाल अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच केसगळती किंवा केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशात लोक बाजारातील महागडी उत्पादने वापतात. ज्यांचे अधिक दुष्परिणाम होतात. या उत्पादनांवर खर्च करण्याऐवजी असे अनेक नॅचरल उपाय आहेत ज्यांनी तुम्ही केस मजबूत करू शकता आणि केसांमधील कोंडा दूर करू शकता. मेथीचे दाणे यासाठी खूप फायदे मानले जातात.

मजबूत-दाट केसांसाठी मेथी

केस मुळापासून मजबूत नसले की, केसगळतीची समस्या अधिक होते. अशात तुम्ही केस मजबूत करण्यासाठी मेथीचा वापर करू शकता. मेथीच्या दाण्यांचं बारीक पावडर तयार करा आणि त्यात खोबऱ्याचं तेल टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांवर लावा आणि डोक्याच्या त्वचेची चांगली मालिश करा. काही वेळाने केस धुवून घ्या. आठवड्यातून काही दिवस हा उपाय करा. तुम्हाला लगेच फरक दिसून येईल.

केसगळतीची समस्या होईल दूर

मेथीच्या दाण्यांच्या सेवनाने केसगळती रोखली जाऊ शकते. मेथीमध्ये प्रोटीन, लेसीथीनरी आणि निकोटिनिक अ‍ॅसिड आढळतं जे केसांना मजबूती देतं. केसगळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने केस धुवा. केस कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. 

डॅड्रफची समस्या करा दूर

डॅड्रफची समस्या केसांसाठी फार घातक असते. डॅंड्रफमुळे केस आणखी कमजोर होतात. डॅड्रफच्या समस्येवर मेथीच्या दाण्यांनी लगेच सुटका मिळवली जाऊ शकते. रात्री मेथीचे दाणे भीजू घाला आणि सकाळी त्या दाण्यांची पेस्ट तयार करा, ही पेस्ट दह्यामध्ये मिश्रित करुन केसांवर लावा. नंतर केस धुवून घ्या.

केस होतील चमकदार

केसांना चमकदार करण्यासाठी मेथीचे दाणे फार फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यांची पावडर तयार करुन त्यात नारळाचं दूध टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून काही वेळासाठी तसेच ठेवा. पेस्ट जेव्हा चांगल्याप्रकारे कोरडी होईल तेव्हा केस शॅम्पूने धुवा. 

Web Title: Struggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek (Methi Seeds) May Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.