​स्टायलिश लूकने बनवा आॅफिसमध्ये वेगळी इमेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2016 11:15 AM2016-08-21T11:15:19+5:302016-08-21T16:55:41+5:30

आॅफिसमध्ये प्रभावशाली दिसण्यासाठी आणि दुस​ऱ्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी आपले राहणीमान आणि ड्रेसची भूमिका महत्त्वाची .....

A stylish look to create a different image in the office! | ​स्टायलिश लूकने बनवा आॅफिसमध्ये वेगळी इमेज!

​स्टायलिश लूकने बनवा आॅफिसमध्ये वेगळी इमेज!

Next
n style="color:#800080;">-रवींद्र मोरे

आॅफिसमध्ये प्रभावशाली दिसण्यासाठी आणि दुसऱ्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी आपले राहणीमान आणि ड्रेसची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी आपल्याला आॅफिसमध्ये नेहमी असा ड्रेस परिधान करुन जायायचा आहे, ज्यामुळे स्वत:च्या आत्मविश्वासात वाढ होईल. संशोधकांनी केलेल्या संशोधनातून काही साध्या आणि सोप्या टीप्स शोधुन काढल्या आहेत, ज्यामुळे आपण आॅफिसात अधिक रुबाबदार दिसू. याबाबत आजच्या फिचरमध्ये ‘सीएनएक्स’ने घेतलेला हा आढावा वाचून आपणही आॅफिसमध्ये चांगली इमेज बनवू शकतो. 


आपल्या बाह्य व्यक्तिमत्त्वाची छाप ही मेक अपवर अवलंबून असते. आपण कोणत्याप्रकारचे आणि कसे मेकअप करतो यावर आपली आॅफिसमध्ये इमेज निर्माण होत असते. संशोधनातून असे आढळून आले आहे की, काही व्यावसायिक आॅफिसेसमध्ये अधिक मेकअपची आवश्यकता असते. त्याच तुलनेने काही मेडिकल सारख्या अन्य क्षेत्राच्या आॅफिसेसमध्ये खूपच कमी किंवा बिल्कु ल मेकअपची आवश्यकताच नसते. यासाठी आपल्या व्यवसायाच्या प्रकारानुसारच आपला मेकअप असावा. 

फ्रेश लूक-
आपला लूक नेहमी फे्रश असणे ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जेव्हाही आपण आॅफिसमध्ये प्रवेश करता, तेव्हा आपण एकदम फ्रे श दिसणे खूप गरजेचे असते. आपण सुस्त आणि थकलेले दिसत असाल तर याचा समोरच्या व्यक्तिंवर चुकीचा प्रभाव पडतो. यासाठी आपल्या लूकसाठी आपण नेहमी तत्पर असावे. 

मॉइश्चराइज-
आपण आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चराइज करा, त्यानंतर फाउंडेशन अप्लाय करा. फाउंडेशन नेहमी ब्रशनेच लावा, कारण बोटांनी लावलेल फाउंडेशन एकसमान लागत नाही. त्यानंतर पावडरने मेकअप कोफायनल टच द्यावा.
 
कॉन्फरन्ससाठी-
जर एखाद्या कॉन्फरन्ससाठी जायायचे असेल जिथे जास्त वेळ मीटिंग असेल त्याठिकाणी आपण पॉलिश्ड लूक ठेवू शकता. प्रोफेशनल लूकसाठी लिप ग्लॉस ऐवजी लाइट शेडची लिपस्टिक लावा. गालांवर हलका ब्लशर लावावा आणि डोळ्यांना आकर्षक बनविण्यासाठी लाइट आयशॅडो आणि मस्कारा अप्लाय करावा. 

एसेसरीज- 
जर आपल्या आॅफिसमध्ये यूनिफॉर्मसोबतच एसेसरीज परिधान करण्यावर काही बंदी नसेल तर आपण विविध शैलीच्या एसेसरीजचा प्रयोग करु शकता. विविध प्रकारचे हलके आभूषण आणि एसेसरीज परिधान करा, ज्यामुळे आपल्याकडे पहिल्या नजरेतच लोकं आकर्षित होतील. 

डिझायनेबल बॅग्ज-
एका वेगळ्या व आकर्षक दिसणाऱ्या बॅगचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. यासाठी आपली आगळी वेगळी छाप पडण्यासाठी एक स्टायलिश डिझायनेबल बॅगची निवड करू शकता. जर आपण उच्च पदावर असाल तर काही वेगळ्या पद्धतीच्या डिझायनेबल बॅग खरेदी करू शकता. 

निवडक टीप्स-
*आॅफिसमध्ये नेहमी ताजेतवाने दिसणे खूपच महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण फ्रेश दिसण्यासाठी फाऊंडेशनसोबतच ब्लॅक आय पेन्सिल आणि मस्काराचा प्रयोग करू शकता. तसेच आय लायनरचाही वापर करू शकता.
* ओठांवर पिच आणि फिकट आॅरेंज रंगाची लिप्स्टीक लावा. शिमर लिप्स्टीक आपल्या ओठांना एक नवा लूक देऊ शकते. 
* गालांवर हलक्या हातांचा हलक्या रंगांचा टचअप द्या.
* आॅफिससाठी तर मेकअप जास्त नकोय जेणेकरून आपला लूक साधा दिसावा. मेकअप करतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मेकअपमुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे.
* उन्हाळ्यात कॉस्मेटिकचा वापर कमीतकमी करावा. याव्यतिरिक्त कोरडा मेकअप म्हणजेच पावडरचा मेकअप उत्तम असतो. 
* केसांवर जास्त प्रयोग करु नका. स्टायलिश केसरचना आॅफिसमध्ये चांगली नाही वाटत. 

Web Title: A stylish look to create a different image in the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.