जेवणानंतर म्हणतं असाल 'कुछ मीठा हो जाये'; तर असं पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:08 PM2019-02-12T14:08:09+5:302019-02-12T14:08:34+5:30
तुम्हालाही जेवल्यानंतर काहीना काही गोड खाण्याची सवय आहे का? जर असं असेल तर अशी सवय असणारे तुम्ही एकटे नाही. अनेक लोकांना जेवल्यानंतर काहीतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते, एवढचं नाही तर जोपर्यंत एखादा गोड पदार्थ ते खात नाहीत तोपर्यंत त्यांचं जेवण पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत नाही.
तुम्हालाही जेवल्यानंतर काहीना काही गोड खाण्याची सवय आहे का? जर असं असेल तर अशी सवय असणारे तुम्ही एकटे नाही. अनेक लोकांना जेवल्यानंतर काहीतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते, एवढचं नाही तर जोपर्यंत एखादा गोड पदार्थ ते खात नाहीत तोपर्यंत त्यांचं जेवण पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत नाही. एवढं ठिक आहे. परंतु जर तुम्हाला गोड पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाण्याची सवय लागली असेल, तसेच हे पदार्थ खाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नसेल तर तुम्ही स्वत:च्या हाताने तुमची स्किन डॅमेज करण्याचं कारण ठरत आहात. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गोड किंवा साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवन तुमची स्किन आणि खासकरून तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान पोहचवण्यासाठी कसं कारणीभूत ठरतं त्याबाबत...
त्वचेला जळजळ होणं
एका संशोधनानुसार, जेव्हा आपण काही गोड पदार्थ खातो. त्यावेळी शरीराच्या साखरेच्या पातळीमध्ये वाढ होते. त्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. जे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं. पण ज्यावेळी तुम्ही जास्त गोड पदार्थांचे सेवन करता त्यावेळी साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी इन्सुलिन जास्त प्रमाणात शरीरामध्ये पसरतं परिणामी त्वचेला जळजळ होणं, सूज येणं आणि इन्फेक्शन होण्यासारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा तर त्वचेवर लाल चट्टेदेखील येतात. जर तुम्हाला आधीपासूनच अॅक्ने किंवा पिम्पल्सच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही समस्याही वाढू शकते.
ब्रेकआउट्सचा धोका अधिक
जास्त गोड पदार्थ किंवा साखरेचे सेवन केल्याने चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या वाढते. ज्यामुळे सर्वात आधी तुमच्या त्वचेवर जळजळ होण्यास सुरुवात होते. अनेकदा तर गोड पदार्थांच्या अतिसेवनाने व्हाइट ब्लड सेल्सला इन्फेक्शनशी लढण्यापासून रोखण्यात येतं. ज्यामुळे अॅक्ने आणि पिम्पलची समस्या आणखी वाढते.
कोलोजेन (collagen)साठी हानिकारक
ज्यावेळी तुम्ही जास्त गोड पदार्थ खाता त्यावेळी तुमच्या शरीरातील शुगर कोलोजेन प्रोटीनसोबत अटॅच होउन ग्लायकेशन करतं. या प्रक्रियेला अॅडवान्स ग्लायकेशन अॅन्ड प्रोडक्ट (AGE) तयार होतं. जे शरीरातील कोलेजनवर अटॅक करतं. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात आणि त्वचेवर वाढत्या वयाचीही लक्षणंही दिसू लागतात.
अॅलर्जी वाढविण्यासाठी कारणीभूत
जर तुम्हाला एखादं स्किन इन्फेक्शन झालं असेल तर जास्त गोड पदार्थ खाल्याने अॅलर्जी वाढू शकते. जर तुमच्या त्वचेवर जळजळ होत असेल आणि त्यावेळी तुम्ही एखादा गोड पदार्थ खात अचसाल तर अॅलर्जी आणखी वाढू शकते. जर तुम्हाला फूड अॅवर्जीची समस्या असेल तर साखरेपासून आणि अतिगोड पदार्थांपासून शक्यतो दूरच राहा. कारण यामुळे अॅलर्जी आणखी वाढू शकते.
चेहऱ्याची त्वचा लाल होणं
क्यूट रेड फेस किंवा पिंक रेड फेस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कारण हा एक नॅचरल हेल्दी ग्लो असतो. परंतु गोड आणि साखर असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन केल्याने त्वचेवर जळजळ होते आणि त्यामुळे स्किनवर लाल चट्टे येतात. तसेच यामुळे स्किन डॅमेज होते.