आला आला उन्हाळा... त्वचेला सांभाळा; डाळिंबाचे फायदे होतील तुम्हाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:11 PM2019-03-26T13:11:36+5:302019-03-26T13:13:28+5:30
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं, जे त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर डाळिंबामध्ये अॅन्टीऑक्सिडंट देखील असतात.
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं, जे त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर डाळिंबामध्ये अॅन्टीऑक्सिडंट देखील असतात. जे त्वचेला तजेलदार करण्यासाठी मदत करतात. डाळिंब त्वचेच्या मृत पेशी रिपेअर करण्यासोबतच हायड्रेट करण्याचं काम करतं. जाणून घेऊया उन्हाळ्यामध्ये फ्रेश स्किनसाठी डाळिंबाचा वापर करण्याच्या काही खास टिप्स...
टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये सर्वांना भेडसावणारी एक कॉमन समस्या म्हणजे, स्किन टॅनिंग. एकदा स्किन टॅन झाली की, पुन्हा त्यापासून सुटका मिळवणं फार कठिण होतं. अशातच डाळिंबाच्या फेस पॅकचा वापर करणं फायदेशीर ठरतं. डाळिंबामध्ये असलेलं अॅन्टीऑक्सिडंट तत्व टॅनिंग काढून टाकण्यासाठी मदत करतात. जर डाळिंबासोबत लिंबू एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग लवकर निघून जाऊन स्किन ग्लो होण्यास मदत होते.
असं तयार करा डाळिंबाचा फेस पॅक :
फ्रेश डाळिंबाचा फेस पॅक तयार करण्यासाठी त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाकून एकत्र करा. हा फेस पॅक कॉटन बॉलच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा. कमीत कमी अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. या फेस पॅकच्या वापराने टॅनिंग कमी होते आणि स्किन ग्लोइंग दिसते.
त्वचा उजळण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हामध्ये जा किंवा नका जाऊ, चेहऱ्याचा उजाळा कमी होतो. याचं कारण म्हणजे, वातावरणातील उकाडा. या उकाड्यामुळे त्वचेच्या पेशी डॅमेज होतात. जर याकडे दुर्लक्षं केलं तर मृत पेशी जमा होतात. ज्यामुळे चेहऱ्याची त्वच काळपट होण्यासोबतच कोरडीदेखील होते. यापासून सुटका करण्यासाठी डाळिंबामध्ये दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा.
असा तयार करा डाळिंबाचा फेस पॅक :
एका डाळिंबाच्या पेस्टमध्ये दोन ते तीन चमचे फ्रेश दही एकत्र करून पेस्ट तयार करा. तुमचा फेस पॅक तयार आहे. आता हा पॅक ब्रशच्या सहाय्याने चेहरा आणि मानेवर लावा, हा पॅक जवळपास 20 ते 25 मिनिटांसाठी तयाच ठेवा आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवून टाका. या पॅकच्या वापराने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन, सॉफ्ट स्किन मिळण्यास आणि त्याचबरोबर त्वचा उजळवण्यासही मदत होते.
चेहऱ्यावर डाळिंबाचा फेस पॅक लावण्याचे काही फायदे :
- सुरकुत्या दूर करण्यासाठी
- पिंपल्सपासून सुटका करणं
- सूर्यकिरणांमुळे होणारी त्वचेची हानी
- नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी मदत करणं
- स्किन हायड्रेट करणं
- भाजलेल्या जखमेवर परिणामकारक
- त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव
- त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी
- त्वचेचा कोरडेपणा दूर होतो
- त्वचा उजळवण्यासाठी
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.