उन्हाळ्यातही केस हेल्दी आणि चमकदार ठेवायचे आहेत?; 'या' टिप्स फॉलो करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 04:16 PM2019-04-24T16:16:08+5:302019-04-24T16:20:32+5:30

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं आणि हवेमध्ये अस्तित्वात असणारी प्रदूषित तत्त्व केसांना डॅमेज करतात.

Summer special hair care tips for shiny healthy and strong hair | उन्हाळ्यातही केस हेल्दी आणि चमकदार ठेवायचे आहेत?; 'या' टिप्स फॉलो करा 

उन्हाळ्यातही केस हेल्दी आणि चमकदार ठेवायचे आहेत?; 'या' टिप्स फॉलो करा 

Next

(Image Credit : Greater Jammu)

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं आणि हवेमध्ये अस्तित्वात असणारी प्रदूषित तत्त्व केसांना डॅमेज करतात. यामुळे केस कोरडे आणि नीर्जीव दिसतात. त्याचबरोबर केसांच्या केसांच्या अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यामध्येही तुमच्या केसांना चमकदार आणि हेल्दी ठेवू शकता. 

1. उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येत असल्याने स्काल्पमध्ये डस्ट जमा होते. ज्यामुळे डँड्रफची समस्या होते आणि केस चिकट होतात. चिकट केसांपासून सुटका करण्यासाठी अनेक लोक दररोज शॅम्पूचा वापर करतात. परंतु दररोज शॅम्पूचा वापर करण्याती सवय केसांना डॅमेज करते. त्यामुळे एक ते दोन दिवसांनी केस धुणं फायदेशीर ठरतं. 

2. उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये हयर सीरम नक्की लावा. त्यामुळे केस चमकदार होण्यासोबतच ऊन आणि प्रदूषणापासून केसांचं रक्षण होतं. 

3. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मालिश करा. 

4. उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडण्याआधी केसांना स्कार्फ किंवा हॅटच्या मदतीने कव्हर करा. 

5. स्काल्पमध्ये ओलावा ठेवण्यासाठी तुम्ही स्मूदिंग किंवा रिफ्रेशिंग स्काल्प मास्कचा वापर करू शकता. 

6. उन्हाळ्यामध्ये केसांना मॉयश्चरची गरज असते. त्यामुळे या वातावरणामध्येही शॅम्पूनंतर कंडिशनरचा वापर नक्की करा. नेहमी प्रोटीन असलेल्या कंडिशनरचीच निवड करा. परंतु कंडिशनर स्काल्पला वापरू नका. 

6. गर्मियों में भी बालों को मॉइस्चर की जरूरत होती है. इसलिए इस मौसम में भी शैंपू के बाद कंडीशनर का इस्तेमाल जरूर करें. हमेशा प्रोटीन बेस्ड कंडीशनर को ही चुनें. लेकिन कंडीशनर को कभी भी स्कैल्प पर न लगाएं.

7. केसांना हेल्दी ठेवण्यासाठी वेळोवेळी ट्रिमिंग करणं गरजेचं असतं. यामुळे केसांना फुटलेले फाटे निघून जातात आणि केस जास्त हेल्दी होतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Summer special hair care tips for shiny healthy and strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.