उन्हाळ्यात त्वचेवर ग्लो आणण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' फेशिअल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:29 PM2019-03-29T19:29:13+5:302019-03-29T19:29:31+5:30

उन्हाळा सुरू होताच त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामनाही करावा लागतो. सतत बाहेर फिरल्यामुळे वातावरणातील उष्णता, धूळ, माती आणि प्रदूषण यांमुळे चेहऱ्याच्या त्वचेची हानी होते.

Summer special These are best facial in summer season | उन्हाळ्यात त्वचेवर ग्लो आणण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' फेशिअल्स

उन्हाळ्यात त्वचेवर ग्लो आणण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' फेशिअल्स

Next

उन्हाळा सुरू होताच त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामनाही करावा लागतो. सतत बाहेर फिरल्यामुळे वातावरणातील उष्णता, धूळ, माती आणि प्रदूषण यांमुळे चेहऱ्याच्या त्वचेची हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते. आपलं सौंदर्य जपण्यासाठी फेशिअल सर्वात उपयोगी ठरतं. पण फेशिअल जर त्वचेच्या प्रकारानुसार केलं नाही तर त्याचे त्वचेवर साइड इफेक्ट्स दिसून येतात. जर फेशिअल व्यवस्थित त्वचेचा प्रकार ओळखून केलं तर त्यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. 

हे आहेत फेशिअल्स :

1. उन्हाळ्यामध्ये बर्फाचे अनेक फायदे होतात. अशातच तुम्ही आइस-क्यूब फेशिअलचा वापर करून चेहऱ्याचं फेशिअल करू शकता. यासाठी काकडीचा रस, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून आइस ट्रेमध्ये ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने 3 ते 5 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून पाच मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. हे फेशिअल त्वचा उजळवण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतं. 

2. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी सी-वीड फेशिअल अत्यंत फायदेशीर ठरतं. सी-वीड फेशिअलमध्ये स्किन आतून स्वच्छ होण्यास मदत होते. कारण यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. 

3. उन्हाळ्यामध्ये तुम्ही चेहऱ्यावर अरोमा थेअरपी फशि्ल करू शकता. या फेशिअलमुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. हे चेहऱ्यामधील विषारी आणि अशुद्ध पदार्थ बाहेर टाक्यासाठी मदत करतात. ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा तजेलदार आणि चमकदार होते. 

4. वॉटरमेलन फेशिअल उन्हाळ्यासाठी उत्तम ठरतं. या फेशिअलमुळे उन्हाळ्यामध्ये होणारं त्वचेचं नुकसान भरून काढण्यासाठी मदत होते. यामुळे फ्रेश लूकमिळवण्यास मदत होते. 

5. उन्हाळ्यामध्ये त्वचा खूप तेलकट होते. तेलकट त्वचेसाठी पर्ल आणि सिल्वर फेशिअल उत्तम ठरतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा तजेलदार होते.

लक्षात ठेवा : उन्हाळ्यामध्ये फेशिअल करताना अजिबात वाफ घेऊ नका. त्यामुळे त्वचा आणखी ऑयली होते.  

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Summer special These are best facial in summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.