उन्हाळ्यामध्ये पायांची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी 'या' फ्रुट्स स्क्रबचा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 05:20 PM2019-04-10T17:20:23+5:302019-04-10T17:21:12+5:30
उन्हाळ्यामध्ये पायांची काळजी घेणंही अत्यंत आवश्यक असत. जर तुम्ही पायांची काळजी घेतली नाही तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : drscholls.com)
उन्हाळ्यामध्ये पायांची काळजी घेणंही अत्यंत आवश्यक असत. जर तुम्ही पायांची काळजी घेतली नाही तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर तुमचे पाय कोरडे होतात, पायाची त्वचा टॅन होण्यासोबतच पायांना भेगाही पडतात. यासाठी तुम्हाला पायांची त्वचा एक्सफोलिएट करून डेड स्किन सेल्सला हटवणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्ही फ्रुट स्क्रबचा वापर करू शकता. या फळांमध्ये असलेली पोषक तत्व आपल्या पायांच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. जाणून घेऊया पायांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या फ्रूट स्क्रबबाबत...
संत्री आणि साखर
संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे पायांना स्क्रब करण्यासाठी मदत करतात. यामुळे पायांची त्वचा निरोगी होते. हे तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा चमचा संत्र्याच्या सालींची पावडर घ्या. त्यामध्ये 6 चमचे साखर एकत्र करा. तयार पेस्टने 2 ते 3 मिनिटांसाठी पायांना स्क्रब करा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. पाय पाण्याने धुवून टाका.
टोमॅटो आणि दही स्क्रब
हे स्क्रब त्वचेवरील एक्सट्रा ऑइल रोखण्यासाठी मदत करतं. दह्यामध्ये असलेलं लॅक्टिक अॅसिड त्वचा उजळवण्यासाठी मदत करतात. हे तयार करण्यासाठी सर्वात आधी अर्धा चमचा टोमॅटोच्या प्यूरीमध्ये 6 चमचे ओटमील आणि 6 चमचे दही एकत्र करून स्क्रब तयार करा. हे स्क्रब पायांना 15 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
लिंबू आणि ऑलिव ऑइल
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सॅट्रिक अॅसिड असतं. जे त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. हे स्क्रब तयार करण्यासाठी 2 चमचे लिंबाच्या रसामध्ये 2 चमचे ऑलिव ऑइल आणि एक चमचा ब्राउन शुगर एकत्र करून स्क्रब तयार करा. हे स्क्रब पायांना 15 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.