Sunny Leone's Birthday Special : 38 वर्षांची झाली सनी लियोनी; 'हे' आहेत तिचे टॉप 5 ब्युटी सिक्रेट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:54 PM2019-05-13T15:54:31+5:302019-05-13T16:00:13+5:30
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनी उर्फ करणजीत वोहराचा आज 38 वा वाढदिवस. कोण्या एका काळी फक्त पॉर्न स्टार म्हणून असलेली आपली ओळख मिटवून सनी लियोनी जगभरामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनी उर्फ करणजीत वोहराचा आज 38 वा वाढदिवस. कोण्या एका काळी फक्त पॉर्न स्टार म्हणून असलेली आपली ओळख मिटवून सनी लियोनी जगभरामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. सनी आपल्या आयटम सॉन्गसोबतच आपल्या अभिनयासाठीही ओळखली जाते. डान्स असो किंवा तिच्या अदा ती नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेते. पण याव्यतिरिक्त सनी लियोनीला तिच्या फिटनेससाठी आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
सनी लियोनी फिटनेससोबतच आपल्या त्वचेचीही काळजी घेते. त्यामुळेच ती नो-मेकअप लूकमध्येही फार सुंदर दिसते. आज सनीच्या बर्थ डेच्या निमित्ताने तिच्या काही ब्युटी टिप्स सांगणार आहोत. जाणून घेऊया आपलं सौंदर्य जपण्यासाठी सनी कोणत्या ब्युटी टिप्स फॉलो करते त्याबाबत...
1. बेस्ट ब्युटी ब्रँड्स
स्किनबाबत सनी कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. ती नेहमी बेस्ट ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करते. तिच्यानुसार, त्वचेसाठी स्वस्त आणि कोणतेही प्रोडक्टस् वापरणं म्हणजे त्वचेला नुकसान पोहोचवणं आहे.
2. बिफोर बेड रूल
रात्री जोपण्यापूर्वी सनी लियोनी पूर्ण मेकअप व्यवस्थित रिमूव्ह करते. रात्रभर मेकअप तसाच ठेवला तर मेकअप चेहऱ्यावरील पोर्स ब्लॉक करतं. त्यामुळे मेकअप रिमूव्ह करणं फायदेशीर ठरतं.
3. नो-मेकअप लूक
ज्या दिवशी शूटिंग किंवा प्रोजेक्ट नसतं त्यादिवशी ती नो-मेकअप लूक कॅरी करते. फेसवर फक्त मॉयश्चरायझरचा वापर करते. जेणेकरून चेहरा फ्रेश राहण्यासोबतच त्वचा मुलायम राहण्यासही मदत होते.
4. दूध
चेहऱ्याला नॅचरल ग्लो देण्यासाठी सनी लियोनी चेहऱ्यासाठी दूध वापरते. याव्यतिरिक्त आपल्या डाएटमध्ये दररोज दूधाचाही समावेश करते. हे त्वचेला आतून पोषण देऊन त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.
5. डाएट
सनी लियोनीच्या सांगण्यानुसार, उत्तम डाएट आपल्याला सुंदर बनवते. पोषणयुक्त डाएट आरोग्यासाठी सौंदर्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. जर नॅचरल पद्धतीने सुंदर दिसायचं असेल तर शॉर्टकटऐवजी योग्य पद्धत निवडू शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताच दावा करत नाही.