उन्हाळ्यामध्ये सेन्सिटिव्ह स्किनसाठी sunscreen निवडताना अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 03:15 PM2019-04-17T15:15:14+5:302019-04-17T15:19:10+5:30
आपल्याला अनेकदा ब्युटी एक्सपर्ट्स सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देत असतात. तसेच आपल्यापैकी अनेकांच्या डेली ब्युटी रूटीनचा एक अविभाज्य घटक असतं सनस्क्रिन.
आपल्याला अनेकदा ब्युटी एक्सपर्ट्स सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देत असतात. तसेच आपल्यापैकी अनेकांच्या डेली ब्युटी रूटीनचा एक अविभाज्य घटक असतं सनस्क्रिन. त्यामुळे कोणत्याही वातावरणामध्ये सनस्क्रिन आप्लाय करणं अत्यंत आवश्यक ठरतं. अनेक लोकांना वाटतं की, जेव्हा उन्हाळ्यामध्ये फार ऊन असतं त्यावेळीच सनस्क्रिन लावणं गरजेचं असतं. परंतु हा समज अत्यंत चुकीचा असतो. कोणत्याही वातावरणामध्ये घरातून बाहेर पडण्याआधी सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिन लावणं गरजेचं असतं.
स्किन डॅमेज करतात यूवी किरणं
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या हानिकारक किरणांमुळे स्किन डॅमेज होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर त्वचेचा रंगही काळवंडतो. या सर्व गोष्टी त्वचेवर लहान वयातच वाढत्या वयाची लक्षणं येण्यासाठी कारणीभूत ठरतात. असं असतानाही अनेक मुली आणि महिला सनस्क्रिन लावणं टाळतात. कारण त्यांना असं वाटतं की, सनस्क्रिन लावल्याने त्यांची त्वचा फआर तेलकट होते किंवा स्किनवर पॅचेस दिसून येतात.
स्किन टाइपनुसार निवडा सनस्क्रिन
त्वचेसाठी कोणतीही गोष्ट वापरण्याआधी आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानंतर कोणताही उपाय करणं अत्यंत आवश्यक असतं. तसचं सनस्क्रिनही त्वचेचा प्रकार ओळखूनच वापरणं अत्यंत आवश्यक असतं. नॉर्मल, ऑयली आणि सेन्सिटिव्ह अशा त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार सनस्क्रिन बाजारात उपलब्ध असतात.
सेन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात घ्या :
- सेन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी लाइट वेट आणि मिनरल्स बेस्ड सनस्क्रिन खरेदी करणं गरजेचं असतं.
- त्याचबरोबर त्यांच्या सनस्क्रिनमध्ये त्वचेला थंडावा देणारी तत्व असणं आवश्यक असतं. त्यामुळे स्किन इरिटेशन कमी केलं जाऊ शकेल. सेन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी सनस्क्रिनमध्ये अॅलोवेरा एक्सट्रॅक्ट्स असेल याची खात्री करून घ्यावी. हे त्वचेला थंडावा देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच यसोबत झिंक ऑक्साइड आणि टायटेनियम डायऑक्साइड असणं गरजेचं आहे.
- प्रयत्न करा की सनस्क्रिनमध्ये जास्त केमिकल्सचा वापर करण्यात आलेला नसावा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.