टॅटूमुळे होत असलेले इन्फेक्शन रोखण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 04:02 PM2020-01-28T16:02:47+5:302020-01-28T16:07:57+5:30
सध्याच्या काळात टॅटू काढणं हे खूप कॉमन झालं आहे.
सध्याच्या काळात टॅटू काढणं हे खूप कॉमन झालं आहे. तसंच तरूणांमध्ये हा ट्रेंड अधिकच फॉलो होताना दिसून येतो. इतकंच नाही तर आता लहान शहरांमध्ये सुद्धा टॅटू पार्लर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या घरात असा एक व्यक्ती तरी असतो ज्यांचा हातावर टॅटू असतो. आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या डिजाईन्सचे टॅटू महिलांसह पुरूष सुद्धा काढत असतात. पण टॅटू काढल्यानंतर त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
टॅ्टूमुळे कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान होत नाही. त्वेचेशी निगडीत आजार पण होत नाहीत. पण इन्फेक्शन होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे.
कोणत्याही सेलिब्रिटी किंवा मित्रांना पाहून कोणत्याही ठिकाणी टॅटू काढायला जाऊ नका. त्यासाठी योग्य आणि प्रोफेशनल ठिकाणाची निवड करा. टॅटू काढल्यानंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून जास्त घाम येऊ देऊ नका.
इन्फेक्टेड लोकांपासून लांब रहा. सुरूवातीचे काही दिवस असे कपडे घाला ज्या कपड्यामुळे तुमच्या शरीरावरील टॅटू झाकलेला राहील. काही प्रकारची समस्या उद्भवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर टॅटू काढलेल्या जागेतून पस बाहेर निघत असेल तर तुम्हाला इन्फेक्शन झाले आहे. त्यावेळी डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा एन्टी बॅक्टीरीयल लिक्विडचा वापर करा. तसंच एन्टीबॅक्टरीयल साबणाचा वापर करा.
जर टॅटू काढलेली त्वचा लाल झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काहीवेळेला त्या ठिकाणी सूज सुद्धा येऊ शकते. तसंच खाज आल्यामुळे त्या त्वचेवर फंगल इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यासाठी वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंट स्टेरलाइज (sterilize) असावेत. ( हे पण वाचा-घामाच्या वासाला हैराण होऊन डिओड्रंट वापरत असाल तर 'असं' पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध)
टॅटू काढल्यानंतर पाण्यापासून स्वतःला काही तास लांब ठेवा. कारण पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. त्यानंतर दिवसातून तीन वेळा टॅटूला धूवा. त्यासाठी एंटीबॅक्टीरियल साबणाचा वापर करा. ( हे पण वाचा-दुधाच्या सायीचे त्वचेला होणारे फायदे वाचून महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सना विसराल)