'ही' आंबट गोष्ट आहे केसांसाठी खुप फायदेशीर, केस बनतील मजबुत आणि दाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:29 PM2022-07-31T18:29:46+5:302022-07-31T18:30:02+5:30

तुम्हाला माहिती आहे का की सहज उपलब्ध होणारी चिंच केसांना मजबूत आणि सुंदर बनवू शकते. चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात.

tamarind is good for hair | 'ही' आंबट गोष्ट आहे केसांसाठी खुप फायदेशीर, केस बनतील मजबुत आणि दाट

'ही' आंबट गोष्ट आहे केसांसाठी खुप फायदेशीर, केस बनतील मजबुत आणि दाट

Next

पावसाळ्याच्या हंगामात केसांच्या (Hair) अनेक समस्या निर्माण होतात. विशेष करून या हंगामात केस गळतीची समस्या अधिकच असते. दररोज 50-60 केस गळणे ठिक आहे, मात्र त्यापेक्षा अधिक जर तुमचे केस गळत असतील तर लगेचच तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते. तसेच केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या समस्या (Problem) दूर करण्यासाठी या हंगामात आपण काही घरगुती टिप्स देखील फाॅलो करू शकतो. ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील (Weather) आर्द्रता आहे. या ऋतूतील ओलावा, घाण आणि तेल केसांच्या टाळूमध्ये जमा होते. पाण्यासोबत या तीन गोष्टींमुळे कोंड्याची समस्या निर्माण होते.

पावसाळ्याच्या हंगामात केस गळतीसोबतच कोंड्याची देखील मोठी समस्या निर्माण होते. तसेच केसांची चांगली काळजी अन्नाद्वारे देखील केली जाऊ शकते. केसांची काळजी घेण्यासोबतच आहाराचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण आपल्या आहारात अशाकाही महत्वाच्या गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. केसांची निगा राखण्यासाठी डाएट प्लॅन तयार करा, पण घरगुती पद्धतींचा अवलंब करूनही ते निरोगी आणि चमकदार बनवता येतात. तुम्हाला माहिती आहे का की सहज उपलब्ध होणारी चिंच केसांना मजबूत आणि सुंदर बनवू शकते. चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात.

तज्ज्ञ देखील या आंबट पदार्थाला म्हणजेच चिंचेला आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. यामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले जाते. जर तुम्ही याचे नियमित सेवन योग्य प्रमाणात आणि पद्धतीने केले तर तुमच्या आरोग्यासोबतच केसही निरोगी होऊ शकतात. पावसाळ्यात केसांना खूप त्रास सहन करावा लागतो. या दरम्यान बहुतेकांना केसगळतीचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन सी चिंचेत भरपूर असल्याने ते केसांना आतून दुरुस्त करते आणि त्यांना निरोगी बनवते. यामुळेच जर आपल्याला केसांच्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण आपल्या आहारात चिंचेचा नक्कीच मसावेश करावा.

 

Web Title: tamarind is good for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.