दातांवर दिसणारे पांढरे डाग असू शकतात 'या' आजाराचे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:40 PM2019-01-09T13:40:14+5:302019-01-09T13:40:38+5:30
काही लोकांच्या दातांवर भुऱ्या किंवा पांढऱ्या रंगांचे डाग दिसू लागतात. या डागांना सामान्य समजून अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.
काही लोकांच्या दातांवर भुऱ्या किंवा पांढऱ्या रंगांचे डाग दिसू लागतात. या डागांना सामान्य समजून अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण ही सामान्य बाब नसून दातांचा एका गंभीर आजार असू शकते. या आजाराला फ्लोरोसिस म्हणून ओळखलं जातं. तसं पाहिलं तर या आजारापासून लगेच सुटका मिळवता येऊ शकते. पण वेळीच उपाय केले तर. पण हे डाग कशामुळे येतात हे जाणून घेऊ...
फ्लोरोसिस होण्याची कारणे
८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुला-मुलींना फ्लोराइड असलेलं मंजन किंवा पेस्ट दिल्याने दातांमध्ये फ्लोरोसिस ही समस्या होते. फ्लोराइड आपल्या दातांसाठी एक गरजेचं तत्व आहे, ज्याने दात मजबूत होतात. सामान्यपणे सर्वच टूथपेस्टमध्ये फ्लोराइडचा वापर केला जातो. पण लहान मुलांसाठी फ्लोराइडचं अधिक प्रमाण धोकादायक ठरु शकतं. त्यामुळेच बाजारात लहान मुलांसाठी वेगळे टूथपेस्ट येतात. ज्यात फ्लोराइडचं प्रमाण कमी असतं.
फ्लोराइडचे साइड इफेक्ट
जास्त फ्लोराइडच्या वापराने फ्लोरोसिस होतो, ज्यात दातांचा रंग बदलतो. डाग दिसू लागतात. पण एकदा जर दात पूर्णपणे विकसित झाले तर दातांवर फ्लोराइडचा प्रभाव होत नाही.
फ्लोरोसिस हा दातांचा आजार होण्यापेक्षा एक कॉस्मेटिक समस्या आहे. अनेकदा ही समस्या इतकी छोटी असते की, डॉक्टरही ओळखू शकत नाहीत. पिण्याच्या पाण्यात योग्य प्रमाणात फ्लोराइड असूनही जर लहान मुलं अधिक प्रमाणात फ्लोराइड टूथपेस्टच्या माध्यमातून घेत असतील तर त्यांना फ्लोरोसिस समस्या होऊ शकते.
फ्लोरोसिसची लक्षणे
फ्लोरोसिसच्या मुख्य लक्षणांमध्ये दातांवर पांढरे, पिवळे डाग दिसणे हे आहे. अनेकदा हे डाग इतके कमी असतात की, लक्ष देऊनही दिसत नाहीत. पण फ्लोरोसिसची समस्या वाढल्यावर डागही वाढतात. त्यामुळे वेळीच यावर उपचार करणे गरजेचे आहे.
फ्लोरोसिसवर उपचार
फ्लोरोसिस दातांचा गंभीर आजार नसून एक कॉस्मेटिक समस्या आहे. याने दातांना केवळ सुंदरता मिळते आणि कॅविटीज तयार होत नाहीत. त्यामुळे डाग दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण जर डाग समोरच्या दातांवर आले असतील तर चिंता वाढू शकते. कारण हे दिसायला फारच वाईट वाटतं.