फुलांसारखे नाजूक हात हवेत? करा हे ४ घरगुती उपाय, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:58 PM2018-12-14T13:58:10+5:302018-12-14T14:01:53+5:30

हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा फार जास्त ड्राय किंवा रखरखीत होऊ लागते. मग याचा प्रभाव केवळ चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर दिसू लागतो.

These 4 home products will make your hands soft | फुलांसारखे नाजूक हात हवेत? करा हे ४ घरगुती उपाय, मग बघा कमाल!

फुलांसारखे नाजूक हात हवेत? करा हे ४ घरगुती उपाय, मग बघा कमाल!

Next

(Image Credit : www.trendmut.com)

हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा फार जास्त ड्राय किंवा रखरखीत होऊ लागते. मग याचा प्रभाव केवळ चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. हातांचीही या दिवसात अवस्था वाईट बघायला मिळते. पण फार काळजी करण्याची गरज नाही. कारण जर तुम्हाला अशी समस्या होत असेल म्हणजे हात फारच ड्राय किंवा रखरखीत आले असतील तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुम्ही हातांना फुलांसारखं नाजूक ठेवू शकता. 

थंड वारं, जास्त काम आणि धुळ-माती यामुळे हाता ड्राय होतात. पण या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला महागडी उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही. आपल्या घरातील काही वस्तूंचा वापर करुन तुम्ही हात सुंदर करु शकता. ते कसे हे जाणून घेऊ...

ऑलिव ऑइल

ऑलिव ऑइलमध्ये आरोग्यदायी फॅटी अॅसिड आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे त्वचेला मुलायम करण्याचं काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव ऑइलने हातांची मसाज करा. सकाळी तुम्हाला फायदा दिसेल. 

मधाने करा हातांची मसाज

अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असलेलं मध हातांना मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी मधाने हातांची चांगली मसाज करा. मध कोरडं झाल्यावर हात पाण्याने धुवून घ्या. 

मिल्स क्रिमने(लोणी) मसाज

मिल्क क्रिममध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक अॅसिड असतं, जे मृत त्वचेपासून सुटका करण्यासाठी आणि पीएच बॅलन्स कायम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी हातांची मिल्क क्रिम क्रिमने मसाज करा आणि १५ मिनिटांसाठी हात तसेच राहू द्या. त्यांनतर कोमट पाण्याने हात स्वच्छ करा. एक आठवडा हा उपाय केला तर चांगला फायदा दिसेल. 

रात्री करा दह्याने मसाज

दह्यामध्येही मिल्क क्रिम असलेले सर्व गुण असतात. घरात जर मिल्क क्रिम नसेल तर दह्याचा वापरही तुम्ही करु शकता. दह्याने नियमीतपणे हातांची मसाज करा आणि काही वेळाने पाण्याने हात स्वच्छ करा. 
 

Web Title: These 4 home products will make your hands soft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.