'हे' आहेत सुरकुत्या दूर करण्याचे 7 उत्तम उपाय; उन्हाळ्यात नक्की करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 04:13 PM2019-04-03T16:13:17+5:302019-04-03T16:18:20+5:30
काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. असा लोकांना उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जर या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्षं केलं तर या लक्षणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते.
(Image Credit : styleofthecitymag.co.uk)
काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. असा लोकांना उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जर या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्षं केलं तर या लक्षणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. उन्हाच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला य उकाड्यातही त्वचा कोमल, यंग आणि सुंदर दिसावी असं वाटत असेल तर तुम्हीला स्पेशल स्किन केयर रूटीन फॉलो करण्याची गरज आहे. खासकरून अशा लोकांना जे सुरकुत्या आणि वाढत्या वयाच्या लक्षणांनी त्रस्त आहेत.
उन्हामध्ये बाहेर पडणं टाळा
प्रीमॅच्योर एजिंग आणि रिंकल्सचं सर्वात मोठं कारण असतं सूर्याची हानिकारक किरणं. त्यामुळे जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तेव्हा सन ब्लॉक क्रिम्स किंवा लोशन्स लावा. डोळ्यांच्या आजूबाजूचस्किन फार सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे सर्वात आधी या ठिकाणी फाइन लाइन्स येतात. सनस्क्रिनमुळे त्वचेचं रक्षण होतं.
हेल्दी डाएट
उन्हाळ्यामध्ये स्किनला योग्य पोषण मिळणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच संतुलित आहार घेणं आवश्यक असतं. सीझनल फळं आणि भाज्या अत्यंत फायदेशीर असतात. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात.
शरीर हायड्रेट ठेवा
पाणी मुबलक प्रमाणात प्या. स्किन मुलायम होण्यासाठी मदत होते. तसेच सुरकुत्या नाहीशा होतात. पाणी आणि जास्त वॉटर कन्टेट असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन-सी, लिंबू पाणी, वॉटरमेन ज्यूस, नारळाचं पाणी किंवा ताक यांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक ठरतं.
तणाव दूर करा
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घर आणि ऑफिस सांभाळताना फार दमछाक होते. तसेच वाढत्या कामामुळे तणाव आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तणाव वाढल्याने आपण मानसिकरित्या त्रस्त असतो. यामुळे त्वचेचं आरोग्यही बिघडतं. जर तुमची इच्छा असेल की, त्वचा डागरहित, ग्लोइंग, तरूण आणि हेल्दी दिसावी तर तणावापासून दूर रहा.
झोपही आवश्यक
अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हेल्दी राहण्यासाठी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. व्यवस्थित झोपल्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. पूर्ण झोप घेतल्याने त्वचा फ्रेश होते आणि रिंकल्सही दूर होतात.
केमिकल्सपासून दूर रहा
त्वचेसाठी हानिकारक केमिकल्सचा वापर करू नका. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर या सर्व प्रोडक्ट्सचा वापर करणं शक्यतो टाळा. डेली स्किन केयर रूटिन फॉलो करा. झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करूनच झोपा. रिंकल्स अनेकदा मेकअप व्यवस्थित न काढल्यामुळे होतात. यामुळे रोमछिद्र बंद होतात आणि त्वचा व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही.
स्किन केयर रूटिन फॉलो करा
क्लिंजिंग, मॉयश्चरायझरचा वापर करून एक्सफोलिएट करा. नियमितपणे मसाज करा. यामुळे ब्लड फ्लो उत्तम होतो आणि स्किन हेल्दी राहते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.