चेहरा आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी असा करा कॉफीचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:03 PM2018-08-29T16:03:19+5:302018-08-29T16:05:28+5:30

अनेक लोकं कॉफी पिणं पसंत करतात. पण कॉफी पिणं शरीरासाठी जसं लाभदायक आहे त्याचप्रमाणे ते त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठीही फायदेशीर आहे.

these are beauty benefits of coffee | चेहरा आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी असा करा कॉफीचा वापर!

चेहरा आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी असा करा कॉफीचा वापर!

Next

अनेक लोकं कॉफी पिणं पसंत करतात. पण कॉफी पिणं शरीरासाठी जसं लाभदायक आहे त्याचप्रमाणे ते त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठीही फायदेशीर आहे. कॉफीच्या बीया चेहऱ्यावरील मृत पेशी काढून चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.  कॉफीपासून तयार केलेले फेस पॅक्स आणि स्क्रब वापरून तुम्ही त्वचा उजळवू शकता. जाणून घेऊयात कॉफीचे सौंदर्य राखण्यासाठी होणारे फायदे...

1. तुम्ही स्क्रब तयार करण्यासाठी कॉफीच्या बियांचा वापर करू शकता. त्यासाठी कॉफीच्या बीयांची बारिक पावडर तयार करा. त्यामध्ये सैंधव मीठ आणि ऑलिव्ह ऑईल टाकून मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. असं केल्याने तुमच्या त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्याचा रंग उजळेल.

2. केसांना कलर करण्यासाठीही कॉफीचा उपयोग होतो. त्यासाठी स्ट्राँग कॉफी तयार करून ती थंड करून घ्या. त्यानंतर केसांना लावून 2 तासांपर्यंत ठेवा. शॅम्पूचा वापर करून केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा वापर केल्याने केसांना रंग चढेल आणि केस चमकदार होतील.

3. कॉफीमुळे डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. त्याचप्रमाणे डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठीही कॉफीचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी कॉफी आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करून घ्या. आणि डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा. कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी ऑक्सिडंट आणि कॅफेन असतं. 

4. कॉफीपासून फेस पॅक तयार करून तुम्ही त्वचेवर लावू शकता. फेस मास्क तयार करण्यासाठी अर्धा कप कॉफी पावडर आणि अर्धा कप कोको पावडर एकत्र करून घ्या. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा दूध आणि एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे तुमच्या त्वचेवर उजाळा येईल तसेच चेहरा चमकदार दिसेल.

Web Title: these are beauty benefits of coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.