केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात 'या' व्हिटॅमिन्सची महत्त्वाची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 12:14 PM2019-06-03T12:14:20+5:302019-06-03T12:18:54+5:30

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांप्रमाणेच केसांनाही व्हिटॅमिन्सची गरज असते. अनेकजण केसगळतीने हैराण होऊन शॅम्पू आणि औषधांचा वापर करतात.

These are essential vitamins for hair growth | केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात 'या' व्हिटॅमिन्सची महत्त्वाची भूमिका!

केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात 'या' व्हिटॅमिन्सची महत्त्वाची भूमिका!

Next

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांप्रमाणेच केसांनाही व्हिटॅमिन्सची गरज असते. अनेकजण केसगळतीने हैराण होऊन शॅम्पू आणि औषधांचा वापर करतात. पण केसांच्या आरोग्यावर वय, जेनेटिक्स आणि हार्मोन्स यांचांही प्रभाव पडत असतो. अशात काही असेही व्हिटॅमिन्स असतात जे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

व्हिटॅमिन ए

केस हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्स ए ची खास भूमिका असते. व्हिटॅमिन ए मुळे तुमचे केस गळणार नाही. पण व्हिटॅमिन ए अधिक प्रमाणात घेतल्यास काही नुकसानही होतात. सप्लिमेंट्स घेण्याऐवजी तुम्ही गाजर, पालक या भाज्यांचं सेवन करू शकता. यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात.

व्हिटॅमिन बी

केस आणि त्वचेसाठी व्हिटॅमिन बी गरजेचं असतं. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केसगळतीची समस्या होऊ शकते. तुम्ही व्हिटॅमिन सप्लिमेंट्सने घेऊ शकता, पण आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच बदाम, मासे, सी फूड, हिरव्या भाज्या यातूनही तुम्ही व्हिटॅमिन ही भरपूर मिळवू शकता.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी त्वचा आणि केस दोन्हींसाठी फायदेशीर असतं. याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सोबतच या व्हिटॅमिनुळे तुमच्या शरीराला आवश्यक आयर्न आणि मिनरल्स मिळतात, जे केसांच्या विकासासाठी फायदेशीर आहेत.

व्हिटॅमिन डी

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, व्हिटॅमिन डी डोक्याच्या त्वचेसाठी फार फायदेशीर असतं. याने केसांची वाढ होण्यात भरपूर मदत मिळते. शरीरात जर व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर केसांच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

व्हिटॅमिन ई

अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतं. नैसर्गिक स्त्रोतांसोबतच व्हिटॅमिन ई तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंटच्या माध्यमातूनही घेऊ शकता.

Web Title: These are essential vitamins for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.