डोक्यात येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 05:26 PM2018-08-29T17:26:08+5:302018-08-29T17:34:30+5:30

अनेक लोकांना पावसाळ्यामध्ये डोक्याला खाज येण्याचा त्रास होतो. तसं पाहता डोक्याला खाज येण्याची अनेक कारणं आहेत. पण अनेकदा केसांच्या मुळांजवळची त्वचा ड्राय झाल्यामुळे डोक्याला खाज येण्याचा त्रास होतो.

these are home remedis for itching on hair scalp | डोक्यात येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय!

डोक्यात येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय!

Next

अनेक लोकांना पावसाळ्यामध्ये डोक्याला खाज येण्याचा त्रास होतो. तसं पाहता डोक्याला खाज येण्याची अनेक कारणं आहेत. पण अनेकदा केसांच्या मुळांजवळची त्वचा ड्राय झाल्यामुळे डोक्याला खाज येण्याचा त्रास होतो. तसेच पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळेही डोक्याला खाज येण्याची समस्या निर्माण होते. किंवा अनेकदा घाई गडबडीत ओलेच केस बांधून ठेवण्यात येतात. त्यामुळेही डोक्यात खाज येते. अनेकदा या त्रासाचे मुख्य कारण हे डोक्याच्या त्वचेला झालेलं मायक्रोबियल इन्फेक्शन असू शकतं. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही डोक्याला येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेऊ शकता.

1. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टी बॅक्टेरिअल आणि अॅन्टी फंगल गुण असतात. लिंबाच्या रसामध्ये मध मिक्स करून केसांच्या मुळांशी लावून मसाज करा. 15 मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका. असं केल्याने डोक्यात येणाऱ्या खाजेची समस्या दूर होईल. 

2. अॅलोवेरा म्हणजेच कोरफडीचा गर त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. याचा उपयोग करून त्वचेला होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुटका करून घेता येते. अॅलोवेरा जेल केसांच्या मुळांशी लावून थोडा वेळ मसाज करा. 15 मिनिटांनी केसांना शॅम्पूने धुवून घ्या. 

3. डोक्यामध्ये येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी टी ट्री ऑइलचाही वापर करता येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीबॅक्टेरिअल आणि अॅन्टी फंगल गुण अस्तित्वात असतात. जे डोक्यात येणाऱ्या खाजेवर फायशीर ठरतात. यासाठी दोन चमचे टी ट्री ऑइलमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून मसाज करा. अर्धा तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाका. आठवडाभर हा उपाय केल्याने तुम्हाला डोक्यात येणाऱ्या खाजेपासून लुटका मिळेल. 

Web Title: these are home remedis for itching on hair scalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.