उन्हाळ्यात मोसंबीचा रस प्या आणि त्वचेच्या समस्यांना दूर पळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 06:40 PM2019-04-29T18:40:24+5:302019-04-29T18:49:19+5:30
उन्हाळ्यामध्ये त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध क्रिम, फेसवॉश इत्यादी उत्पादनांचा आधार घेतो.
उन्हाळ्यामध्ये त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध क्रिम, फेसवॉश इत्यादी उत्पादनांचा आधार घेतो. यामुळे त्वचेवरील डागांपासून सुटका करणं सहज शक्य होतं. परंतु यामध्ये केमिकल्स असल्यामुळे कधी-कधी त्वचेला नुकसानही पोहोचतं. त्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी मोसंबीचं फळ अत्यंत उपयोगी ठरतं. मोसंबीचा ज्यून प्यायल्याने त्वचेच्या समस्याही दूर होतात.
मोसंबीचा ज्यूस अत्यंत फायदेशीर :
1. ब्लॅकहेड्स आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये ब्लॅकहेड्स आणि डार्क सर्कल्स होणं ही एक साधारण समस्या आहे. मोसंबी या समस्येवर अत्यंत फायदेशीर ठरते. मोसंबीच्या ज्यूसचे सेवन केल्याने ब्लॅकहेड्स आमि डार्क सर्कल्स दूर होतात. त्यामुळे स्किन चमकदार होते.
2. पिंपल्सपासून सुटका
मोसंबीचा ज्यूस रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका होते. मोसंबीचा ज्यूस चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतात.
3. त्वचेच्या अनेक समस्यांवर उपयोगी
मोसंबीचा ज्यूस उन्हाळ्यामध्ये मान, कोपर, गुडघे, ओठ, डोळ्यांच्या आजूबाजूला असलेली काळी वर्तुळं यांसारख्या समस्या दूर होतात. मोसंबीचा ज्यूसमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टीबायोटिक्स आणि किटाणुंपासून बचाव होतो.
4. चेहऱ्यावर लावल्यानेही होतो फायदा
मोसंबीचा ज्यूस पिण्याशिवाय तो चेहऱ्यावर लावल्यानेही अनेक फायदे होतात. मोसंबीला दोन भागांमघ्ये कापून तिचा रस चेहऱ्यावर लावा. मोसंबीमध्ये आढळून येणारं सिट्रिक अॅसिड ब्लीच आणि क्लींजिंगचं काम करतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.