'या' सोप्या पद्धतीने तयार करा स्ट्रॉबेरी बॉडी वॉश; त्वचेच्या सर्व समस्या होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 08:09 PM2019-03-26T20:09:56+5:302019-03-26T20:11:24+5:30
बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्किन केयर प्रोडक्ट्सचा वापर करताना तुमच्या मनात विचार येतच असेल की, या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करावा का?
बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्किन केयर प्रोडक्ट्सचा वापर करताना तुमच्या मनात विचार येतच असेल की, या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करावा का? तर तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. पण त्यासाठी तुमच्या आवडीच्या आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या पदार्थांचा वापर करा. त्याचबरोबर ती वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होणारी असावी. खरं तर स्वयंपाकघरामध्ये आढळून येणाऱ्या अनेक पदार्थांचा वापर स्किन केअर प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी करण्यात येतो. ज्यामध्ये फेस वॉश, फेस पॅक, स्क्रब, लोशन, मॉइश्चरायझर आणइ बॉडी वॉशचा समावेश असतो. जेव्हा स्किन केयरसाठी एखाद्या फळाचा विचार करण्यात येतो. त्यावेळी सर्वांच्या मनात विचार येतो, तो म्हणजे स्ट्रॉबेरीचा...
साहित्य :
- 4 ते 5 स्ट्रॉबेरी
- 2 चमचे कोकनट ऑइल
- ½ कप कॅसाइल साबण
- 1 चमचा व्हिटॅमिन ई-ऑइल
- 1 चमचा लेव्हेंडर ई-ऑइल
- 1 चमचा लेव्हेंडर एसेंशियल ऑइल
असं करा तयार -
- स्ट्रॉबेरी घेऊन त्या क्रश करा आणि त्यांचा पल्प एका बाउलमध्ये एकत्र करा. त्यानंतर हे व्यवस्थित एकत्र करा ज्यामुळे पाण्याप्रमाणे पेस्ट तयार होईल.
- पल्प तयार झाल्यानंतर एका पॅनमध्ये खोबऱ्याचं तेल मंद आचेवर गरम करत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये पल्प एकत्र करा.
- तेलाला ज्यावेळी हलका गुलाबी रंग येईल त्यानंतर त्यामध्ये कॅसाइल साबण एकत्र करून घॅस बंद करा. जेव्हा हे मिश्रण थंड होईल त्यावेळी एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल कापून त्यामध्ये एकत्र करा.
- त्यानंतर यामध्ये लेवेंडर एसेंशिअल ऑइल एकत्र करा. तुमचा स्ट्रॉबेरी बॉडी वॉश तयार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, हा बॉडि वॉश थंड आणि कोरड्या जागी ठेवा. याव्यतिरिक्त बॉडी वॉशचा वापर करण्याआधी व्यवस्थितशेक करून घ्या.
फायदे :
- हे स्किनला पोषण देण्यासाठी मदत करतं.
- हे त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.
- त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठीही मदत करतं.
- पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत ठरणारा बॅक्टेरिया दूर करण्यासाठी मदत करतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.