आजीबाईच्या बटव्यातील हे आयुर्वेदिक उपाय; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 03:54 PM2019-02-19T15:54:17+5:302019-02-19T15:54:45+5:30

हेल्दी आणि ग्लोइंग स्किनचं गुपित आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आहारामध्ये हेल्दी खा आणि व्यायाम करा. परंतु सध्या बाहेरील गोष्टी त्वचेला फार प्रभावित करत असतात.

These herbs are very beneficial for skin problems | आजीबाईच्या बटव्यातील हे आयुर्वेदिक उपाय; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी फायदेशीर!

आजीबाईच्या बटव्यातील हे आयुर्वेदिक उपाय; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी फायदेशीर!

Next

हेल्दी आणि ग्लोइंग स्किनचं गुपित आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आहारामध्ये हेल्दी खा आणि व्यायाम करा. परंतु सध्या बाहेरील गोष्टी त्वचेला फार प्रभावित करत असतात. जसं धूळ आणि प्रदूषण. या कारणाने त्वचेशी निगडी अनेक समस्या जसं अ‍ॅक्ने, पिंपल्स आणि वेळे आधी दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं इत्यादी होऊ लागतात. 

केमिकलयुक्त प्रोडक्ट यूज करण्याऐवजी नॅचरल पद्धतीने त्वचेवर उपचार करणं फायदेशीर असू शकतं. कारण यामुळे स्किनला कोणत्याही प्रकारे डॅमेज होत नाही. नॅचरल पद्धतीने उपचार केल्यामुळे फक्त वरूनच ग्लोइंग आणि सुंदर होत नाही, तर आतूनही हेल्दी आणि स्पॉटलेस होते. आम्ही आज तुम्हाला आयुर्वेदिक गोष्टींबाबत सांगणार आहोत. जे तुमच्या स्किनला हेल्दी आणि स्पॉटलेस करण्यासाठी फायदेशीर ठरतील. 

कडुलिंब

सर्वांनाच माहीत आहे की, कडुलिंब त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतो. कडुलिंबामध्ये अ‍ॅन्टीइंफ्लामेटरी, अ‍ॅन्टी-बॅक्टेरिअल, अ‍ॅन्टी-वायरल आणि अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रॉपर्टी आढळून येतात. कडुलिंब चेहऱ्यावरील  डार्क स्पॉट, अ‍ॅक्ने दूर करून चेहऱ्याला नॅचरल ग्लो देण्यासाठी मदत करतं. त्यासाठी कडुलिंबाची पानं पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड करून घ्या. त्या पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करा. तुम्ही गरज असल्यास कडुलिंबाची पानं क्रश करून त्यापासून फेसपॅक तयार करू शकता.  

कोरफड

कोरफडीचा वापर तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. दररोज कोरफडीच्या गराने चेहऱ्याल मसाज केल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्याल मदत होते. तसेच चेहऱ्यावरील अॅक्ने, लाल चट्टे आणि पिगमेन्टेशनपासून सुटका करण्यासाठी कोरफड मदत करते. 

केशर

अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, जर गरोदरपणामध्ये महिलांनी केशराचं सेवन केलं तर पोटातील बाळाच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. तसं या गोष्टीचा कोणताच पुरावा नाही. परंतु केशर गरम दूधात भिजवून तोंडाला लावल्याने टॅन, अ‍ॅक्ने यांसारख्या समस्या दूर होतात. तचेस त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. 

चंदन 

चंदन त्वचेसाठी कूलिंग एजेंटप्रमाणे काम करतं. जे सनबर्न, टॅन, रॅशेज आणि अ‍ॅक्ने यांपासून सुटका मिळण्यास मदत करतो. चंदन एक उत्तम क्लिंजिंग आहे आणि स्किन हायड्रेट, मुलायम करण्यासाठी मदत करतं. त्वचेवर दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही चंदन मदत करतं. 

हळद

हळद आपल्या औषधी गुणधर्मांमुळे फार प्रसिद्ध आहे. यामध्ये अ‍ॅन्टीसेफ्टिक, अ‍ॅन्टीइंफ्लामेटरी गुणधर्म अस्तित्वात असतात. हळदीसोबत दूध एकत्र करून हे फेसपॅकप्रमाणे लावल्याने त्वचेच तारूण्य टिकवण्यासोबतच ती उजळण्यासही मदत होते. 

Web Title: These herbs are very beneficial for skin problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.