'या' घरगुती उपायांनी दूर करा हाता-पायांना घाम येण्याची समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 02:51 PM2018-12-19T14:51:43+5:302018-12-19T15:00:47+5:30

घाम येणे ही एक सामान्य बाब आहे. घामाच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे समस्येलाही निमंत्रण देऊ शकतं.

These home remedies will remove sweating problems in the palms and feet | 'या' घरगुती उपायांनी दूर करा हाता-पायांना घाम येण्याची समस्या!

'या' घरगुती उपायांनी दूर करा हाता-पायांना घाम येण्याची समस्या!

googlenewsNext

घाम येणे ही एक सामान्य बाब आहे. घामाच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे समस्येलाही निमंत्रण देऊ शकतं. पण काही लोकांना हिवाळ्यात किंवा विशिष्ट्य वातावरणात हात आणि पायांना घाम येत असल्याचे बघितले जाते. जास्त घाम येण्याला वैद्यकीय भाषेत हायपरहायड्रोसिस म्हटले जाते. ही समस्या काही घरगुती उपायांनीही कमी केली जाऊ शकते, असे मानले जाते.

एपल विनेगर

हात किंवा पायाला अधिक घाम येत असेल तर अॅपल विनेगर वापरणे फायदेशीर ठरते. यात घाम नियंत्रित करणारे काही नैसर्गिक गुणधर्म असतात. याने रोमछिद्रे बंद होतात. अॅपल विनेगर सेवन केल्याने शरीराची पीएच लेव्हल संतुलित राहते. याने शरीराचा मेटाबॉलिज्म स्तरही वाढतो. याने वजन कमी होण्यास मदत मिळते. जाडेपणाही कधी कधी जास्त घाम येण्याचं कारण ठरु शकतो. त्यामुळे घाम येणारी जागा कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर कापसाच्या मदतीने एपल विनेगर लावा. ते रात्रभर तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यावर बेबी पावडरला वापर करा. एपल विनेगर तुम्ही गुलाबजलमध्ये मिश्रित करुनही वापरु शकता.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये कूलिंग आणि एस्ट्रिजन्ट गूण असतात. याने जास्त घाण येणे रोखलं जातं. यानेही रोमछिद्रे बंद होण्यास मदत मिळते. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराचं तापमान कमी होतं, त्यामुळे घाम कमी येतो. त्यासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून तुकड्याने जास्त घाम येणाऱ्या जागांवर मसाज करा. तसेच टोमॅटोचा ज्यूसही तुम्ही घाम येणाऱ्या जागांवर लावू शकता. १५ मिनिटांनी पाण्याने ते भाग स्वच्छ करा. 

लिंबाचा रस

लिंबू शरीरातून बॅक्टेरिया दूर करतो. एका लिंबाच्या रसात बेकिंग सोडा टाकून पेस्ट तयार करा. जिथे तुम्हाला अधिक घाम येतो, तिथे ही पेस्ट लावा. ही पेस्ट साधारण १० मिनिटे तशीच लावून ठेवा. याव्यतिरीक्त एक कप पाण्यात एका लिंबाचा रस मिश्रित करा. या पाण्यात कपडा भिजवून त्याने शरीर पुसा. त्यानंतर आंघोळ करा. हा उपाय दिवसातून एकदा करा.

ब्लॅक टी

ब्लॅक टी हायपरहायड्रेसिसची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. ब्लॅक टीमध्ये टॅनिन आणि एस्ट्रिजन्ट गूण असतात ज्याने घाम शोषला जातो. टॅनिन शरीराचं तापमान थंड ठेवतं, याने घाम कमी येतो. यासाठी दिवसातून २ ते ३ कप ब्लॅक टी चं सेवन करा. 

(टिप : हे उपायांनी तुमची घामाची समस्या सुटेल असा दावा आम्ही करत नाही. केवळ उपलब्ध असलेली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. शिवाय प्रत्येकाती शरीर रचना वेगळी असते त्यामुळे प्रत्येकालाच या उपायांचा फायदा होईल हेही निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे समस्या अधिक जास्त असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 
 

Web Title: These home remedies will remove sweating problems in the palms and feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.