केस वाढवण्यासाठी उन्हाळ्यात 'हे' होममेड हेयर मास्क ठरतात उपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 01:04 PM2019-04-10T13:04:09+5:302019-04-10T13:04:24+5:30
उन्हाळ्यामध्ये वातावणातील वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचेसोबतच केसांनाही नुकसान पोहोचतं. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची फार मोठी भूमिका असते. प्रत्येकालाच आपले कस सुंदर आणि मजबूत असावेत अशी इच्छा असते.
उन्हाळ्यामध्ये वातावणातील वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचेसोबतच केसांनाही नुकसान पोहोचतं. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची फार मोठी भूमिका असते. प्रत्येकालाच आपले कस सुंदर आणि मजबूत असावेत अशी इच्छा असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. झटपट उपाय म्हणून अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. पण त्यांचाही काही उपयोग होत नाही. उलट यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त केमिकल युक्त प्रोडक्ट्स आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि केसांचं आरोग्य वाढविण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती हेयर मास्कबाबत सांगणार आहोत. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून अगदी सहज हे मास्क तुम्ही तयार करू शकता.
(Image Credit : FashionLady)
1. बनाना हेयर मास्क
केसांच्या मजबुतीसाठी त्यांची मुळं मजबूत असणं आवश्यक असतं. त्यासाठी बनाना मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. केळ्यामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन अस्तित्त्वात असतात. ज्यामुळे केसांना आवश्यक ती पोषक तत्व मिळण्यास मदत होते. केळ्याचा मास्क तयार करण्यासाठी पिकलेल्या केळी मिकस्रमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध एकत्र करून केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.
2. कोकोनट हेयर मास्क
कोकनट मास्क केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त हे मास्क कोरड्या आणि कुरळ्या केसांवर परिणामकारक ठरतात. कोकनट हेयर मास्क तयार करण्यासाठी एक कप खोबऱ्याच्या तेलामध्ये अर्धा कप ऑलिव्ह ऑइल एकत्र करून केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर केसांवर शॉवर कॅप लावून जवळपास एक तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर एखाद्या हर्बल शॅम्पूने आणि कंडिशनरने केस धुवून टाका.
3. ओटमील हेयर मास्क
ज्या लोकांचे केस ऑयली असतील आणि डँड्रफमुळे ते खराब झाले असतील तर त्यांच्यासाठी ओटमील मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यासाठी एक चमचा ओटमील, एक चमचा ताजं दूध आणि एक चमचा बदामाचं तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर केसांना ही पेस्ट लावा आणि 15 ते 20 मिनिटांन कोमट पाण्याने धुवून घ्या.
4. हिबिस्कस हेयर मास्क (जास्वंदाच्या फूलापासून तयार केलेला हेयर मास्क)
हिबिस्कस मास्क केसांची कमजोर मुळं मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त हिबिस्कस मास्क केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवून केस दाट करतं. हा बेयर मास्क तयार करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये 6 ते 7 जास्वंदाची पानं रात्रभर भिजत ठेवा. सकाळ पाव कप पाण्यामध्ये दोन चमचे दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांना लावून 20 ते 25 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि थंड पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांसाठी फायदेशीर असतीलच असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.