पिण्याच्या पाण्यासोबत 'या' गोष्टींच सेवन करा आणि चेहऱ्याचं सौंदर्य वाढवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 04:57 PM2019-03-02T16:57:59+5:302019-03-02T16:58:15+5:30
चेहऱ्यावरील डाग सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. जास्तीत जास्त लोक यावर उपाय म्हणून वेगनेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांचा वापर करण्यात येतो.
चेहऱ्यावरील डाग सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. जास्तीत जास्त लोक यावर उपाय म्हणून वेगनेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांचा वापर करण्यात येतो. असं करणं त्वचेसाठी अत्यंत नुकसानदायी ठरतं. तसेच यामुळे आपल्या त्वचेवरही वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्याऐवजी जर घरगुती पदार्थांचा उपयोग केला तर त्वचेसाठी ते फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला तजेलदार त्वजा पाहिजे असेल तर त्वचेवरील घाणीसोबतच शरीरामधील अपायकारक पदार्थही बाहेर टाकणं गरजेचं असतं. यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे, तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये काही खास पदार्थ एकत्र करून प्यायल्याने शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत होते. जाणून घेऊयात अशा काही पदार्थांबाबत...
दालचीनी
पिण्याचं पाणी उकळताना त्यामध्ये एक चुटकीभर दालचीनी पावडर आणि सफरचंदाचे काही तुकडे एकत्र करा. त्यानंतर ते पाणी गाळून प्या. चवीला उत्तम लागणारं हे पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मदत करतं.
स्ट्रॉबेरी
पिण्याच्या पाण्यामध्ये स्ट्रॉबेरीचा रस एकत्र करून प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासाठी मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
मध
मधामध्ये बॅक्टरियाशी लढण्यासाठी मदत करणरी पोषक तत्व असतात, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यामध्ये मध एकत्र करून प्यायल्याने शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील त्वचेवरील डागही दूर होतात.
सब्जा
तुळशीच्या प्रजातीच्या या बिया एखाद्या सुपरफूड्सपेक्षा कमी नाहीत. यामध्य अॅन्टी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळ निस्तेज त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
पुदीना
पुदीन्याचं पाणी प्यायल्याने पोट साफ राहतं आणि चेहऱ्याची चमक वाढते. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरतं. परिणामी आरोग्यासोबतच त्वचाही निरोगी होण्यास मदत होते.
लिंबू किंवा सफरचंदाचं व्हिनेगर
पिण्याच्या पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करून त्याचं सेवन करा. यामुळे फक्त पचनक्रिया सुरळीत होत नाही तर, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. लिंबाच्या ऐवजी एक ग्सा पाण्यामध्ये सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करून त्याचं सेवन करू शकता.