आकर्षक, टोकदार नाकासाठी वापरा 'या' खास टिप्स, बघणारे बघतच राहतील....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:12 AM2019-12-12T11:12:04+5:302019-12-12T11:25:34+5:30

आम्ही तुम्हाला काही सोपे व्यायाम सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही नाक शेपमध्ये आणू शकता आणि तुमचा चेहरा आकर्षक करू शकता.

These tips you can use for perfect nose shape | आकर्षक, टोकदार नाकासाठी वापरा 'या' खास टिप्स, बघणारे बघतच राहतील....

आकर्षक, टोकदार नाकासाठी वापरा 'या' खास टिप्स, बघणारे बघतच राहतील....

googlenewsNext

(Image Credit : healthandaesthetics.co.uk)

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात नाकाचं मोठं योगदान असतं. पण प्रत्येकालाच एकसारखं किंवा धारदार नाक मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. पण काही लोक नाक शेपमध्ये आणण्यासाठी मेकअप करतात. इतकेच नाही तर काही लोक सर्जरी सुद्धा करतात. पण आम्ही तुम्हाला काही सोपे व्यायाम सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही नाक शेपमध्ये आणू शकता आणि तुमचा चेहरा आकर्षक करू शकता.  

१) नाक वर-खाली करा

(Image Credit : faizabeautycream.com)

जसजसं आपलं वय वाढतं, तसतशा आपल्या शरीरातील हाडं आणि मांसपेशींमध्ये बदल होतो. त्यामुळे लहान मुलांच्या मालिशवर जास्त भर दिला जातो. त्यांच्या नाकाशी मालिश करून योग्य शेप दिला जातो. नाक शेपमध्ये आणण्यासाठी बोट नाकाच्या शेंड्यावर लावून नाक खाली-वर करा. याने नाकाचा शेप योग्य राहील. 

२) नाकाची मालिश

नाकाची मसाज करूनही नाक योग्य शेपमध्ये आणलं जाऊ शकतं. नाक वर-खाली आणि डावी-उजवीकडे क्रीम किंवा तेल लावून मसाज करून योग्य शेपमध्ये आणलं जाऊ शकतं. त्यासोबतच मालिश केल्याने सायनस आणि मायग्रेनची समस्याही दूर होऊ शकते.

३) नाक डावी-उजवीकडे फिरवा

(Image Credit : Youtube)

श्वास आत घेऊन नाक डावी-उजवीकडे मुव्ह करा, याने नाक शेपमध्ये येण्यास मदत होईल. त्यासोबतच नाकाच्या छिद्रांना बंद करा आणि उघडा. या व्यायामाने नाकाच्या मांसपेशींना आराम मिळतो. हा व्यायाम एकदा करून नक्कीच फायदा होणार नाही. 

४) नाक दोन्ही बाजूने दाबा

नाक दोन्ही बाजूने प्रेस केल्याने नाक बारीक केलं जाऊ शकतं. ही एक्सरसाइज करण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांनी नाकाच्या दोन्ही बाजूने दाबत पुढच्या बाजूने आणावे. ही एक्सरसाइज नाक शेपमध्ये आणण्यासाठी फायदेशीर ठरेल.

५) श्वासांचा व्यायाम

नाक शेपमध्ये आणण्यासाठी हाताच्या एका बोटाने नाकाचं एक छिद्र बंद करून दुसऱ्या छिद्राने श्वास घ्या आणि पुन्हा याचप्रकारे दुसऱ्या बाजूने छिद्रे बंद करून मोकळ्या छिद्रातून श्वास घ्या. याने नाक शेपमध्ये येईल. 


Web Title: These tips you can use for perfect nose shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.