मॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:25 PM2019-08-11T12:25:04+5:302019-08-11T12:25:45+5:30
त्वचेसाठी मॉयश्चरायाझर अत्यंत फायदेशीर ठरतं. मॉयश्चरायझरमुळे फक्त त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठीही मदत होते.
त्वचेसाठी मॉयश्चरायाझर अत्यंत फायदेशीर ठरतं. मॉयश्चरायझरमुळे फक्त त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठीही मदत होते. दरम्यान, प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच प्रकारचं मॉयश्चरायझर प्रत्येकालाच सूट होईल असं नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा स्किन टाइप ओळखून योग्य मॉयश्चरायझरची निवड करू शकता.
ऑयली स्किन
चेहरा धुतल्यानंतर काही वेळातच जर तुमच्या चेहऱ्यावर पोर्स दिसू लागले किंवा काही वेळातच तुमची त्वचा तेलकट झाली तर तुमची त्वचा ऑयली आहे. कोणतंही कॉस्मेटिक प्रोडक्ट खरेदी करताना या सर्व गोष्टी लक्षात घ्या. अशा त्वचेसाठी वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉयश्चरायझरचा वापर करा. यामध्ये व्हिटॅमिन ई असेल तर ते त्वचेसाठी आणखी फायदेशीर ठरेल.
ड्राई स्किन
चेहरा धुतल्यानंतर जर तुमच्या त्वचेवर कोरडेपणा जाणवत असेल तर तुम्हाला जेल बेस्ड मॉयश्चरायझर सूट करणार नाही. तुम्हाला अशा मॉयश्चरायझरची गरज आहे, ज्याचं टेक्शचर थिक असेल. खरेदी करण्याआदी ते हातावर लावून पाहा. मॉयश्चरायजर अप्लाय करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक ठरतं ती म्हणजे, जरी हे मॉयश्चरायझर थिक असलं तरिही ते त्वचेमध्ये पूर्णपणे अब्जॉर्ब होईल याची काळजी घ्या.
कॉम्बिनेशन स्किन
जर तुमच्या चेहऱ्यावरील टी-झोन म्हणजेच, फोरहेड, चिन आणि नाकाच्या आजूबाजूची त्वचा तेलकट होत असेल पण गाल ड्राय असतील तर तुमचा स्किन टाइप कॉम्बिनेशन असणारा आहे. खरं तर बाजारात या स्किन टाइपसाठी मॉयश्चरयाझर मिळणं फार कठिण आहे. त्यामुळे तुम्ही ऑयली आणि ड्राय स्किनचे मॉयश्चराझर वापरू शकता.
नॉर्मल स्किन
नॉर्मल स्किन टाइप असणार्या लोकांसाठी मॉयश्चराझर निवडणं फार सोपं असतं. कारण या लोकांना तेलकटपणा किंवा कोरडेपणा सारख्य समस्यांचा सामना करावा लागत नाही. या व्यक्ती बाजारात उपलब्ध असणाऱ्या जास्तीत जास्त क्रिम्स ट्राय करू शकतात. दरम्यान, लक्षात ठेवा की, मॉयश्चरायझर खरेदी करण्याआधी त्याची कंपनी नक्की चेक करा. तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थही तपासून पाहा. जर कोणतंही असं तत्व आढळून आलं, ज्यामुळे त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता असेल तर ते मॉयश्चरायझर खरेदी करू नका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.