तुम्हालाही दाढी केल्यानंतर जळजळ आणि खाज येते? 'या' ५ उपायांनी समस्या होईल कायमची दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:36 PM2020-08-13T14:36:49+5:302020-08-13T14:52:30+5:30
घरच्याघरी दाढी केल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जोपर्यंत तुम्ही योग्य पद्धतीनं दाढी करत नाही किंवा त्वचेची काळजी घेत नाही तोपर्यंत त्वचेचं नुकसान होणं थांबणार नाही.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता सलून पार्लर पुन्हा सुरू झाले असले तरी लोकांना दाढी करण्यासाठी किंवा केस कापण्यासाठी प्रत्येक आठवड्यात सलूनमध्ये जाण्याची भीती वाटते. म्हणून लोक घरच्याघरी दाढी करत आहेत. घरच्याघरी दाढी केल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जोपर्यंत तुम्ही योग्य पद्धतीनं दाढी करत नाही किंवा त्वचेची काळजी घेत नाही तोपर्यंत त्वचेचं नुकसान होणं थांबणार नाही. शिवाय पुळ्या येणं, खाज येणं, लाल चट्टे येणं, रक्त येणं अशा समस्या उद्भवतात.
या चूकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो. दाढीसाठी फोम व्यवस्थित तयार करणं, जुन्या ब्लेडचा वापर करणं, लोशनचा वापर न करणं, क्लोज शेवसाठी जास्त दबाव टाकाणं यांचा समावेश आहे. रेजरचा वापर करताना तुम्ही सावधगिरी बाळगली नाही जखम होण्याची शक्यता असते. ही जखम बरी होण्यासाठी बराच वेळ लागतो. तोपर्यंत चेहरा खराब दिसू शकतो. रेजरचा वापर जास्त वेदनादायक असल्यामुळे त्वचेची जळजळ होण्याची शक्यता असते. म्हणून दाढी केल्यानंतर होणारी जळजळ दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला खास उपाय सांगणार आहोत.
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल रेजर बर्नच्या समस्येसाठी फायदेशीर ठरते. रेजरच्या वापरामुळे येणारी खाज खुजली दूर करण्यासाठी आणि जखमेचे व्रण घालवण्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. एलोवेरात अनेक एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे स्किन इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
बर्फाच्या तुकड्यानं मसाज करा
दाढी करताना ब्लेड लागल्यानंतर खाज येते किंवा रक्तस्त्राव होतो. अशावेळी दाढी केल्यानंतर बर्फाच्या तुकड्यानं मसाज केल्यास त्वचेला ग्लो येऊन त्वचा चांगली राहते. याशिवाय नारळाच्या तेलानेही तुम्ही मसाज करू शकता. नारळाचं तेल एंटीसेप्टिक असून त्वचेसाठी नुकसानकारक ठरणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशी ठरते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते.
टी बॅग्स
चहाच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे त्वचेच्या सगळ्या समस्या दूर करता येऊ शकतात. चहाच्या पानांमध्ये एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे जखम भरण्यास मदत होते. टी बॅग २ किंवा ३ दिवसांपेक्षा जूनी वापरू नका. टी बॅग्स त्वचेवर लावण्याासाठी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने धूवुन जखम झालेल्या ठिकाणी लावा. ही क्रिया दोन दिवस केल्यानं रेजर बर्नची समस्या लगेचच दूर होईल.
हे पण वाचा-
... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक
'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा