उन्हामुळे केस ड्राय झाले आहेत का?; 'या' टिप्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 06:21 PM2019-05-24T18:21:46+5:302019-05-24T18:23:40+5:30
उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. तुमचे केस कर्ली, वेवी, स्ट्रट कसेही असोत, उन्हाचा आणि उकाड्याचा यांच्यावर परिणाम होतोच.
उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. तुमचे केस कर्ली, वेवी, स्ट्रट कसेही असोत, उन्हाचा आणि उकाड्याचा यांच्यावर परिणाम होतोच. हिटमुळे केस डल, ड्राय आणि डॅमेज होतात. तसेच जास्त वेळ एसीमध्ये राहिल्याने केसांचं मॉयश्चर कमी होतं. उन्हाचा परिणाम केसांवर होऊ नये त्यासाठी काही सोप्य टिप्स...
सर्वात आधी उन्हामध्ये केस छोटेच ठेवा. कारण उन्हाळ्यामध्ये घाम, प्रदूषणामुळे केस गळतात. अशातच मोठ्या केसांची काळजी घेणं अवघड होतं. तसेच मोठया केसांमुळे उन्हाचा त्रासही सहन करावा लागतो.
- जर तुम्हाला छोटे केस करायचे नसतील तर केसांवर हॅट, स्कार्फ बांधूनच घरातून बाहेर पडा. लक्षात ठेवा, स्कार्फ जास्त टाइट बांधू नका आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही केसांचा बचाव करा.
- जर तुम्ही स्वीमिंग करत असाल तर पूलमध्ये उतरण्याआधी केस थोडे ओले करा. त्यानंतर त्यावर थोडंसं कंडिशनर लावा. स्वीमिंग करून झाल्यानंतर आंघोळ करताना कंडिशनर काढून टाका.
- उन्हामध्ये बाहेर निघण्यापूर्वी केसांचा बन बांधा किंवा केस वरती बांधून टाका. त्यामुळए केसांचा उन्हापासून बचाव होतो. उन्हामुळे त्यांना नुकसान होणार नाही.
- जर तुम्हाला जास्त वेळ उन्हामध्ये थांबावं लागणार असेल तर केसांवर सनस्क्रिन लावा. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळा. घरातून बाहेर पडत असाल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करा.
- जर उन्हामध्ये बाहेर पडणं गरजेचं असेल तर त्यानंतर सन रिपेअर हेअर मास्क नक्की वापरा. शॅम्पू केल्यानंतर डीप कंडिशनिंगही करा. दही, मायोनिज यांसारखे नॅचरल कंडिशनरचाही वापर करा.
- उन्हाळ्यामध्ये हेअर ड्रायर आणि कर्लरस वैगरेचा वापर कमीत कमी करा. उन्हाळ्यामध्ये एसीमुळेही केसांचं नॅचरल मॉयश्चरायझर कमी होतं. त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात प्या आणि केसांसाठी सिरमचा वापर करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.