बिअर्ड लूकची हौस असेल तर जाणून घ्या दाढी येण्याचं योग्य वय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:05 PM2020-02-20T12:05:30+5:302020-02-20T12:18:53+5:30

दाढी असल्यानं एलर्जी आणि अस्थमा होत नाही. दाढी वाढवल्यामुळे चेहऱ्यावर मुरमं आणि डाग पडत नाही. तसेच चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते.

Tips for beard growth in easiest way | बिअर्ड लूकची हौस असेल तर जाणून घ्या दाढी येण्याचं योग्य वय काय?

बिअर्ड लूकची हौस असेल तर जाणून घ्या दाढी येण्याचं योग्य वय काय?

googlenewsNext

(image credit- pinterest)

प्रत्येकालाच बिअर्ड लुक हवा असतो. कारण सध्याच्या काळात तरूण असो किंवा ज्येष्ठ व्यक्ती सगळ्यांना बीअर्ड हवी असं वाटत असतं. पण दाढी येण्याच्या वेगवेगळ्या स्टेज तुम्हाला माहीत नसतील. दाढी येण्याचं वयं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं असतं. अनेक तरूणांना  लवकर दाढी येते, अनेकांना उशीरा सुद्धा येते. दाढी येण्यामागे हार्मोन्स जबाबदार असतात. कारण त्यामुळे शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. शरीराच्या अनेक भागांवर केस येत असतात.  आज आम्ही तुम्हाला दाढी येण्याचं योग्य वय काय आहे त्याबाबत सांगणार आहोत. 

(Image credit-mens care)

प्युबर्टी 

प्यूबर्टी शरीरातील बदलाची प्रक्रिया आहे. ज्यात एक लहान मुलगा मोठ्या वयात प्रवेश करत असतो. त्याकाळात प्रजनन करण्यासाठी तयार होत असतो. त्यानंतर मुलांच्या अवयवांमध्ये, आवजात बदल होत असतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात केस येत असतात. 

या वयात येते दाढी

(image credit-talk charge block)

मुलांमध्ये प्युबर्टीची सुरूवात ११ ते १२ वर्ष वयोगटात सुरूवात होत असते.  १५ ते १७ वयादरम्यान संपण्याच्या मार्गावर असते. प्रत्येकाची दाढी येण्याचे वय वेगवेगळं असू शकतं.  त्यात जेनेटिक्सची एक महत्वाची भूमिका आहे. त्यावरच दाढीची लांबी आणि दाटपणा ठरत असतो. सर्वसाधारणपणे  ६ महिन्यांपासून १ वर्षापर्यंतचा कालावधी लागतो.  तरूणवयात १२ ते १५ वयोगटात टेस्टोस्टेरोन लेव्हल खूप जास्त असते. त्यावयात दाढी यायला सुरूवात होत असते. शरीरातील टेस्टोस्टोरॉन या हार्मेनवर  तुमच्या दाढीची लांबी आणि घनता किती असेल हे ठरत असतं. १९ ते ३८ या वयात टेस्टोस्टोरॉनचा स्तर २४६-९१६ नॉनोग्राम  प्रति डेकिलिटर असतो. एनाजेन (anagen), केटाजेन (catagen), टेलोजेन (telogen) या दाढी येण्याच्या तीन स्टेज आहेत. ( हे पण वाचा-दीर्घकाळ तरूण राहण्यासाठी बेस्ट आहे मुळ्याचा फेसपॅक, 'असा' करा तयार)

दाढी वाढवण्याचे अनेक फायदे आहेत सूर्याच्या किरणांनी त्वचेचं नुकसान होतं. परंतु दाढी असल्यानं कारणानं सूर्याची किरणं त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच दाढीमुळे चेहऱ्याला संरक्षण मिळत असून, जंतुसंसर्गापासूनही बचाव होतो. तसेच दाढी असल्यानं एलर्जी आणि अस्थमा होत नाही. दाढी वाढवल्यामुळे चेहऱ्यावर मुरमं आणि डाग पडत नाही. तसेच चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. या गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या आहेत. ( हे पण वाचा-हिवाळ्यात जास्त झोपल्यामुळे वाढलेलं वजन झटपट कमी करण्यासाठी करा ही ५ योगासन!)

Web Title: Tips for beard growth in easiest way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.