थंडीच्या दिवसात वाढते डॅंड्रफची समस्या, करा हे सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:39 AM2018-12-18T11:39:34+5:302018-12-18T11:44:25+5:30
थंडीच्या दिवसात केसांत होणारा कोंडा अधिक हैराण करणारा मुद्दा ठरत असतो. याला कारण वातावरणातील बदल हे आहे. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घ्यावी लागते.
(Image Credit : liveabout.com)
थंडीच्या दिवसात केसांत होणारा कोंडा अधिक हैराण करणारा मुद्दा ठरत असतो. याला कारण वातावरणातील बदल हे आहे. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घ्यावी लागते. अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतही असतील पण त्यातून फायदा होतच असेल असेही नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत. या उपायांच्या मदतीने तुम्ही चमकदार आणि डॅंड्रफ फ्री केस मिळवू शकता.
(Image Credit : inat.com)
१) आठवड्यातून एकदा गरम खोबऱ्याच्या तेलाने किंवा बदाम तेलाने डोक्याच्या त्वचेची मसाज करा. याने डोक्यातील रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. तसेच याने केसांचा रखरखीतपणाही दूर होतो आणि केस अधिक चमकदार दिसतात.
२) थंडीच्या दिवसात केसांची ट्रिमिंग करणे फायदेशीर ठरतं. थंड वाऱ्यामुळे केस रखरखीत आणि निर्जीव होतात. ज्यामुळे केस तुटतात आणि दोन तोंड असलेल्या केसांचीही समस्या होते. ट्रिमिंग केल्याने तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
३) आपणा सर्वांनाच माहिती आहे की, शॅम्पूनंतर कंडिशनिंग करणे केसांसाठी गरजेचं असतं. हिवाळ्यातही कंडिशनिंग केल्याने केस चांगले राहण्यास मदत मिळते.
४) थंडीच्या दिवसात दररोज केस धुणे टाळावे. दररोज केस धुतल्याने डोक्यात असलेलं नेसर्गिक तेल कोरडं होतं आणि याने केस रखरखीत होतात. केस फारच खराब झाले असतील तर आठवड्यातून केवळ २ दिवस केस धुवावे.
५) थंडीच्या दिवसात जितकं शक्य असेल केस स्कार्फच्या माध्यमातून झाकून ठेवा. याने तुम्ही स्टायलिशही दिसाल आणि केसांचीही काळजी घेतली जाईल.