केसांना कलर केल्यानंतर 'या' टिप्स ट्राय करा; कलर जास्त वेळ टिकण्यास होईल मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:27 PM2018-10-13T13:27:25+5:302018-10-13T13:28:34+5:30
प्रत्येकजण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. पार्लरच्या महागड्या हेअर ट्रिटमेंट्सदेखील करण्यात येतात.
प्रत्येकजण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. पार्लरच्या महागड्या हेअर ट्रिटमेंट्सदेखील करण्यात येतात. पार्ल्ररमध्ये महागड्या ट्रिंटमेट करण्याऐवजी तुम्ही अनेक घरगुती उपयांनी घरच्या घरी अनेक गोष्टी करू शकता. बरेचजण केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी त्यांना कलर करण्याचा मार्ग स्विकारतात. तुम्ही घरच्या घरी केसांना करा किंवा पार्लरमध्ये जाऊन कलर करा. मनामध्ये फक्त एकच इच्छा असते की, आपण केलेला कलर जास्तीत जास्त वेळ तसाच रहावा. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पांढरे केस. जर तुम्हाला तुमचा कलर जास्तीत जास्त वेळ तसच ठेवायचा असेल तर जाणून घेऊयात काही खास टिप्स. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या केसांचा कलर जास्तीत जास्त वेळ टिकवू शकता.
1. हेअर कलर केसांवर तेव्हाच खूप वेळ टिकू शकेल जेव्हा कलर करण्याआधी केसांवर लक्ष देण्यात येईल. कलर करण्यापूर्वी एक महिनाआधी केसांच्या मजबूतीवर लक्ष देणं गरजेचं असतं. आठवड्यातून कमीतकमी तीन वेळा केसांना तेल लावा. केसांची निगा राखा. मोठ्या प्रमाणात केस गळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर हेअर कलर करा.
2. जेव्हा तुम्ही केसांना कलर करणार असाल त्यावेळी तुमच्या केसांनुसार योग्य त्या प्रोडक्टचा वापर करा. जर मागच्यावेळी हेअर कलर करताना केसांना त्रास झाला असेल तर यावेळी प्रोडक्ट बदलून वापरा.
3. जर तुम्ही स्वतः घरच्या घरीच केस कलर करणार असाल तर केस कलर करण्यासाठी आणलेल्या प्रोडक्टवर लिहिलेल्या सर्व सुचना नीट वाचा आणि त्यानुसार कलर करा.
4. हेअर कलर केल्यानंतर केसांना काही दिवसांपर्यंत केस धुण्यासाठी जास्त शॅम्पू वापरू नका. जर पहिल्या आठवड्यात 3 ते 4 वेळा शॅम्पू करत असाल तर आता कमी करून 2 ते 3 वेळा करा.
5. हेअर करल केल्यानंतर डॅमेज झालेल्या केसांना ट्रिम करा. नाहीतर केसांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
6. हेअर कलर केल्यानंतर कोणत्या शॅम्पूचा वापर करायचा या गोष्टीवर लक्ष द्या.
7. शॅम्पूसोबत चांगलं कंडिशनरचाही वापर करा. केसांसाठी शॅम्पू जेवढा गरजेचा आहे तितकाच कंडिशनरही महत्त्वाचं आहे. याचा चुकीचा वापर केल्याने केस डॅमेज होण्याची शक्यता असते.
8. हेअर कलर केल्यानंतर केस अधिक ड्राय होऊ लागतात. त्यामुळे केस मॉयश्चरायझ करणं गरजेचं असतं. काही होम मेड हेअर पॅक केसांना लावा. मध, कोरफड, दही, कोकनट मिल्क यांसारख्या गोष्टी स्काल्प आणि केसांना लावल्याने केसांना पोषण मिळण्यास मदत होते.
9. काही लोकांचा असा समज आहे की, हेअर कलर केल्यानंतर केसांना कमी तेल लावावं. परंतु असं केल्याने केस आणखी कमजोर होतात. परिणामी ते आणखी तुटतात.