नॅचरल पिंक लिप्ससाठी बीट करेल मदत; असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:13 PM2019-07-25T12:13:05+5:302019-07-25T12:13:32+5:30
बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक पोषक तत्व असलेलं बीट खाल्याने शरीरला अनेक फायदे होतात. आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही मदत करतं.
बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक पोषक तत्व असलेलं बीट खाल्याने शरीरला अनेक फायदे होतात. आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही मदत करतं. बीटामध्ये आडळून येणारी पोषक तत्व त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही मदत करतात. खासकरून तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक गुलाबी ग्लो आणायचा असेल तर बीट अत्यंत उपयोगी ठरतं. ओठांनाही गुलाबी रंग देण्यासाठी बीट मदत करतं.
ओठांना नैसर्गिक गुलाबी आणि मुलायम करण्यासाठी बीटाचा असा वापर करता येऊ शकतो :
लिप टिंट
बीट किसून घ्या आणि एका कपड्याच्या मदतीने गाळून घ्या. या बीटाच्या रासमध्ये इतर कोणताही पदार्थ जाणार नाही याची काळजी घ्या. या ज्यूससोबतच खोबऱ्याचं तेल एकत्र करून दोन्ही व्यवस्थित एकत्र करा. एका टिंट बॉटलमध्ये हे भरून ठेवा. त्यानंतर डायरेक्ट किंवा ब्रशच्या मदतीने ओठांवर लावा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्यासोबतच मुलायमही होतील.
ओठांचा रंग सुधारण्यासाठी
अनेकदा ओठांचा नैसर्गिक रंग नाहीसा होऊन ते काळे दिसू लागतात. त्यासाठी एक चमचा बीटाचा रस घेऊन त्यामध्ये दूधाची मलई एकत्र करा. तयार पेस्टने ओठांना व्यवस्थित मसाज करा आणि 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे धुवून टाका. दररोज रात्री असं करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसून येईल.
(Image credit :AtHomeDiva)
बीटाचा स्क्रब
चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु, आपण ओठांकडे मात्र दुर्लक्षं करतो. ओठांवरही डेड स्किन जमा होते. ज्यामुळे ते काळे पडू लागतात. यासाठी बीटाच्या रसासोबत साखर एकत्र करा आणि ओठांवर स्क्रब करा. यामुळे ओठ सॉफ्ट होण्यासोबतच गुलाबी होण्यासही मदत होईल.
ही पद्धत ठरेल फायदेशीर...
पिंक लिप्ससाठी बीटाचा रस मधासोबत एकत्र करणं फायदेशीर ठरतं. अर्ध बीट किसून घ्या आणि त्याचा रस काढून घ्या. त्यासाठी एक चमचा मध एकत्र करा आणि हे मिश्रण साधारणतः 15 मिनिटांसाठी लिप्सवर लावा. हलक्या गरम पाण्याने हे धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.