दीपिका पादुकोनप्रमाणे आयब्रो मिळवण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:18 PM2019-04-08T17:18:37+5:302019-04-08T17:19:08+5:30
सध्या मोठ्या आयब्रो ठेवण्याची फॅशन आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोनपासून ते चुलबुल आलिया भट्ट पर्यंत सर्वच अभिनेत्री ही स्टाइल फॉलो करताना दिसतात.
सध्या मोठ्या आयब्रो ठेवण्याची फॅशन आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोनपासून ते चुलबुल आलिया भट्ट पर्यंत सर्वच अभिनेत्री ही स्टाइल फॉलो करताना दिसतात. ही फेसला नॅचरल लूक देते, जो त्यांच्या न्यूड मेकअपसोबत परफेक्टली मॅच करते. काही मुलींचे आयब्रो फार पातळ असतात. अशातच त्या मेकअपमार्फत थिक लूक देण्याचा प्रयत्न करतात. या समस्येसाठी आम्ही सांगणार आहोत काही घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या आयब्रोला थिक लूक देणं शक्य होइल.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल फक्त केसांना नाही तर आयब्रो वाढविण्यासाठीही मदत करतात. या तेलामध्ये असणारे प्रोटीन, फॅट अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि आयर्न यांसारखी तत्व केसांची ग्रोथ वाढवतात आणि नवीन केस येण्यासाठी मदत करतात.
एरंडेल तेल
आयब्रो दाट करण्यासाठी सर्वात जुना आणि फायदेशीर पद्धत मानली जाते. बोटांवर तेलाचे काही थेंब घ्या आणि आयब्रोवर मसाज करा. यामुळे फक्त नवीन केस नाही तर आयब्रोची थिकनेस वाढण्यास मदत होते. पण त्याआधी तेल त्वचेवर लावून टेस्ट करून घ्या. कारण एरंडेल तेल सर्वांना सूट करेल असं नाही.
कांद्याचा रस
सल्फर, सिलीनीअम, मिनरल्स, व्हिटॅमिन बी आणि सी यांसारखी तत्व कांद्याच्या रसामध्ये मुबलक प्रमाणात असतात. कांद्याचा रस हेयर रिग्रोथ करण्यासाठी मदत करतो. हा रस कॉटन किंवा क्यू टिपच्या मदतीने लावा आणि एक तासानंतर धुवून टाका. दुर्गंध हटवण्यासाठी लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता.
अंड्याचा बलक
अंड्याचा पिवळा भाग केसांच्या ग्रोथसाठी गुणकारी मानला जातो. एग योक व्हाइट पार्टपासून वेगळा करून व्यवस्थित फेटून घ्या आणि त्यानंतर ब्रशच्या मदतीने आयब्रोवर लावा. दररोज असं केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल. जर तुमची स्किन ऑयली असेल तर अंड्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करा.
मेथी दाणे
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी पेस्ट तयार करून आयब्रोवर जवळपास अर्ध्या तासासाठी लावा. यामध्ये असणारी तत्व फॉलिकल्सची समस्या दूर करून नवीन केस उगवण्यासाठी मदत करतात. खास गोष्ट म्हणजे, ही पेस्ट सर्व स्किनला सूट करते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.