​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2016 02:27 PM2016-06-15T14:27:14+5:302016-06-15T20:03:05+5:30

तंबाखूचे व्यसन जरा अधिक घातक आहे.

'Tobacco' is more dangerous than Charas-Ganj | ​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक

​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक

Next
णत्याही प्रकारच्या नशेचे व्यसन वाईटच असते. परंतु तंबाखूचे व्यसन जरा अधिक घातक आहे. ते कसं?

समजा वीस वर्ष चरस-गांजा यांसारख्या तत्सम नशेच्या पदार्थांचे धुम्रपान केल्यावर फफ्फुसाची जी अवस्था होईल ती तंबाखूमुळे होणाऱ्या दयनीय अवस्थेच्या तुलनेत फार तोडकी असेल.

एका नव्या स्टडीमध्ये धुम्रपान करणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा वीस वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यांपैकी अर्धे तंबाखू स्मोकर्स तर अर्धे पॉट (चरस-गांजा) स्मोकर्स होते.

अध्ययनाअंती असे दिसून आले की, तंबाखू धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये फफ्फुसाचे आजार, चयापचय क्रियेतील बिघाड आणि  इनफ्लेमेशन यांसारख्या समस्या दिसून आल्या तर पॉट स्मोकर्समध्ये अशा कुठल्याही प्रकारचा समस्या आढळून आल्या नाहीत.

पण हो, पॉट स्मोक करणाऱ्या लोकांच्या दातांमध्ये एवढी कीड आढळून आली की जणू काही त्यांनी मागचे वीस वर्षे डेन्टल फ्लॉस केलेच नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या एका संशोधनात असे तथ्य समोर आले की, अमेरिकतीत एक तृतांश लोक दातांची निगा राखण्यासाठी फ्लॉस करतच नाहीत.

मग आश्चर्य वाटले ना की, तंबाखूमुळे फफ्फुसाला मोठी हानी पोहचते तर पॉट स्मोकिंगमुळे केवळ दात किडतात.आता याचा अर्थ कसा घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.

Weed

Web Title: 'Tobacco' is more dangerous than Charas-Ganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.